गरम मसाल्याच्या पदार्थांमधील महत्वाचा घटक म्हणजे धने. स्वयंपाक घरात धन्यांना विशेष स्थान आहे. रोजच्या स्वयंपाकात धने आवर्जुन वापरले जातात. आमटी किंवा भाजीत धने हमखास टाकले जातात. आपण भारतीय वर्षानुवर्षापासुन धन्याचा वापर स्वयंपाक घरात व तसेच औषधासाठी उपयोग करून घेत आहोत. औषधी व अन्न पदार्थांसह धने पुजेसाठीही वापरले जातात. भारतात अनेक ठिकाणी धने शुभ मानले जातात व त्यांचा पुजेच्या ताटात इतर साहित्यासोबत समावेश केला जातो. अनेक ठिकाणी शुभकार्यात शुभ मुहुर्त किंवा शुभ शकुन म्हणुन गुळ व धने वाटण्याची पद्धत आहे.
धण्याला लॅटिनमध्ये अंब्रेली फेरी, इंग्रजीत
कोरिअँडर, संस्कृत
भाषेत धान्यक किंवा धन्यक व मराठीत धने, धन्या, धनिया, कोथिंबिर इत्यादी नावे आहेत.
हे एक मसाल्याचे झाड आहे.
धन्यांची माहिती युरोपखंडात फार प्राचीन कालापासून आहे. हिंदुस्थानातून मसाल्याचे
जिन्नस ईजिप्तमध्ये गेल्या शतकापर्यंत रवाना होत. परंतु हल्ली कोथिंबीरीची लागवड
रशिया, हंगेरी, हॉलंड, बोरक्को इत्यादी देशांत
झाल्यामुळे आता ते हिंदुस्थानातून ईजिप्तला रवाना होत नाहीत.
हिंदुस्थानात निरनिराळ्या प्रांतांत याची लागवड निरनिराळ्या वेळी करितात. व ती बहुधा मिश्रपीक म्हणून केली जाते. बंगाल व संयुक्त प्रांत यामध्ये हिवाळ्यात मुंबईप्रांतात पावसाळ्यात व मद्रास इलाख्यात शरद ऋतूत याची लागवड करतात. नेपाळमध्ये धन्याचे मोठे उत्पन्न होते. पंजाबांतहि याची लागवड प्रत्येक जिल्ह्यांत आहे. कोथिंबिरीच्या पानांचा भाजीत, कढीत स्वाद येण्याकरिता व धन्याचा उपयोग मसाल्यांत करितात.
गावरानी
धान्याचा दाणा लहान व काळसर असतो. बदामी धन्याचा दाणा गावरानीपेक्षा दुप्पट मोठा व
पिवळा असतो. बदामी धन्यास जास्त दिवस स्वाद राहतो; दुय्यम पिकाकरिता गावरानी बी वापरतात.
धन्याकरिता कोरडवाहू शेतात हळवे व गरवे अशी दोन्ही पिके शेकडो एकर करतात. धन्याचे
उत्पन्नही चांगले होते.
कोथिंबीरीची लागवड भारतातील बहुतेक सर्व राज्यात केली जाते. कोथिंबीरीच्या विशिष्ट स्वादयुक्त पानांसाठी कोथिंबीरीला वर्षभर मागणी असते. मात्र कोथिंबीरीची लागवड प्रामुख्याने खरीप आणि रब्बी हंगामात केली जाते. उन्हाळी हंगामात कोथिंबीरीचे उत्पादन कमी असले तरी मागणी मात्र भरपूर असते. त्यामुळे कोथिंबीरीच्या लागवडीस चांगला वाव आहे. कोथिंबीर ही रोजच्या आहारात वापरली जाणारी महत्वाची पालेभाजी आहे. कोथिंबीरीच्या विशिष्ठ स्वादयुक्त पानावर इतर भाज्यांचा स्वाद वाढविण्यासाठी शाकाहारी तरी मांसाहारी पदार्थामध्ये कोथिंबीरीचा वापर करण्यात येतो. कोथिंबीरीच्या वडया चटणी आणि कोशिंबीर लोकप्रिय आहे.
उष्ण गुणाचे असून पाचक, अन्नाची रूची वाढवणारे, लघवी साफ करणारे, पित्ताचे सर्व विकार, अम्लपित्त, शरीरातील पित्त वाढल्याने येणारा ताप, जुलाब, शरीरातील काही विशिष्ट जंत यावर उपयोगी आहे. अनेक गृहिणी आपल्या स्वयंपाक घरात धणेव जिरे बारीक करून एकत्र पावडर तयार करून ठेवतात व भाजीत किंवा आमटीत वापरतात.
धणे व जिरे-
धने व जिरे समप्रमाणात घेऊन बारीक करून त्याचा मसाला बनवण्यात येतो. हा मसाला प्रत्येक भाजीत वापरता येतो. धनेजिरे पावडर शरीरातील पित्त कमी करते व पाचक, रूचिवर्धक आहे. पित्ताचे सर्व आजार व शरीरात वाढलेली उष्णता यावर ही धनेजिऱ्याची पावडर खूप गुणकारी आहे.
अर्धा चमचा धने, एक कप दूध व अर्धा चमचा साखर उकळून रोज सकाळी प्यायल्याने शरीरातील उष्णता कमी होते व पचनक्रिया सुधारते.
वारंवार तहान लागत असल्यास धन्याचा खूप चांगला फायदा होतो. रात्री एक ग्लास पाण्यात दोन चमचे धने भिजवावे व सकाळी कुस्करून पाणी गाळून घ्यावे व ह्या पाण्यात साखर व मध घालून थोड्या थोड्या वेळाने प्यावे.
तापात रूग्णाच्या शरीरात उष्णता वाढल्याने वारंवार तहान लागते. अश्यावेळी धने, साखर व काळे मनुका पाण्यात भिजत ठेवावे व ७-८ तासाने चांगले कुस्करून गाळून हे पाणी घोट घोट प्यावे. मधुमेहाच्या रूग्णांनी फक्त मनुका व धन्याचं पाणी प्यावे साखर टाळावी.
शरीरात अतिरिक्त उष्णता वाढलेली असतांना रात्री पाण्यात धने भिजवावे व सकाळी कुस्करून हे पाणी रोज प्यावे शरीरातील उष्णता कमी होते.
ज्यांना लघवीला त्रास होत आहे व अडकून अडकून लघवीला होत आहे अश्यांनी रोज सकाळी धन्याचा काढा प्यावा. काढ्या प्यायल्याने लघवी साफ होते. तसेच धने व गोखरूचा काढा तूप टाकून प्यावा. लघवी संबंधीतील तक्रारी कमी होतात.
धणे रुचीवर्धक व मूत्रल असतात. तोंडाची अरुची नाहीशी करण्यासाठी कोथींबीरिची चटणी खातात, त्याने चांगली भुकही लागते.
खोकल्यावर धणे हे अप्रतिम ओषध आहे.त्यासाठी धणे व ज्येष्ठमध यांचा काढा घ्यावा.
धणे कृमिनाशक असून लहान मुलांना जंत किंवा कृमी यांचा त्रास होत असल्यास त्यांना धणे व साखर खावी,त्याने पित्त शमते.
शौचस पातळ व आमयुक्त होत असल्यास धण्याचा काढा घ्यावा. आमांश बरा होतो .
धणे लोह युक्त असतात.
तर असा मी कोथिंबीर आणि धणे त्या दोन्ही रुपात तुमच्या रोजच्या आहारात उपयोगी पडतो. याशिवाय माझे अनेक मित्र आहेत. पुढच्या भागात पाहू लवंगी चे फायदे आणि महत्व.


Khup chaan mahiti 👌👌
ReplyDeleteधने याबद्दल माहिती होती त्यात थोडी वाढ झाली.
ReplyDeleteमस्त माहिती
ReplyDeleteसुप्रिया
उपयुक्त माहिती. धन्यवाद
ReplyDelete