मसाल्याचा मसला भाग - ६ लवंग

 


 गरम मसाल्याच्या ग्रुप मधली मी अतिशय महत्वाची आणि औषधी गुणधर्म असलेली अस्सल ठसकेबाज लवंग. माझ्याच नावाने ओळखिली जाणारी लवंगी मिरची पण असते. अत्यंत तडाखेबाज व्यक्तिमत्व आहे माझे; तर पाहूया माझी माहिती आणि फायदे.

लवंग हे एक पीक अतिशय महत्‍वाचे स्‍थान असलेले किंमती पीक आहे. भारतात प्रामुख्‍याने हे पीक केरळ, तामिळनाडू आणि कर्नाटक राज्‍यात घेतले जाते. लवंगाचा उपयोग अन्‍न पदार्थांना स्‍वाद व चव देण्‍यासाठी तसेच अनेक प्रकारच्‍या औद्योगिक उत्‍पादनात लवंग तेलाचा उपयोग होतो. टूथपेस्‍ट, दातदुखी वरील औषधे, पोटातील विकारांवर औषधे तसेच उत्‍तम प्रतीची अत्‍तरे सुवासिक साबण व व्‍हॅनिला तयार करण्‍यासाठी लवंग तेलाचा उपयोग होतो. लवंगापासून साधारण  १५ ते १७ टक्‍के तेल मिळते.

हवामानातील साधर्म्‍यामुळे केरळ प्रमाणेच महाराष्‍ट्रातील कोकण विभागात लवंग लागवडीस चांगलाच वाव आहे. कोकण कृषि विद्यापीठाने विद्यापिठांतर्गत असणा-या विविध संशोधन केंद्रावर लवंगेची लागवड केली जाते आणि त्‍यामध्‍ये पिकांची वाढ व उत्‍पन्‍न समाधानकारक असल्‍याचे दाखवून दिले आहे. 

उंच व सदापर्णी वृक्षाचे मूलस्थान इंडोनेशियातील मोलकाझ (मोलूकू) बेटे हे असून मलेशियातील काही बेटांवरही तो आढळतो. त्याची लागवड श्रीलंका, इंडोनेशिया, मॅलॅगॅसी, झांझिबार, पेंबा (टांझनिया), सेशेल्झ बेटे, पिनँग, रेयूर्न्यो बेट, मॉरिशस व वेस्ट इंडीज येथे केलेली आहे. भारतात तमिळनाडूत (निलगिरी, तिरूनेलवेली व कन्याकुमारी जिल्ह्यात) आणि केरळमध्ये (कोट्ट्यम्, एर्नाकुलम, व त्रिवेंद्रम जिल्ह्यात) लवंग वृक्ष लागवडीत आहेत. लवंगेचा अंतर्भाव पूर्वी यूजेनिया प्रजातीत करण्यात येत असे परंतु आता तसा करीत नाहीत तथापि आद्याप यूजेनिया कॅरिओफायलाटा, कॅरिओफायलस ॲरोमॅटिक्स, मिर्टस कॅरिओफायलस इ. नावे पाठ्यपुस्तकात लवंगेकरिता वापरलेली आढळतात. रामायण, चरकसंहिता, सुश्रुतसंहिता व महाकवी कालिदासाच्या संस्कृत काव्यात व नाटकात लवंगेचा उल्लेख आढळतो. चीनमध्ये इ. स. पू. तिसऱ्या शतकात ती उपयोगात होती. जावातून चीनच्या हान दरबारात लवंग आणली गेली बादशाहाशी बोलताना आपला श्वास (मुख) सुगंधित करण्यासाठी लवंग तोंडात ठेवण्याची चिनी लोकांची रीत असे.रोमन लोकांना तिची माहिती होती. प्राचीन काळी चिनी लोकांचा भारत व अँवोइना येथे लवंगांचा व्यापार होता.

लवंगाचे झाड नेहमी हिरव्यागार पानांनी भरलेले सदाहरित असते. उंची १२-१३ मीटर असते. खोडाची साल पिवळट, धुरकट, तसेच कोवळी असते. या झाडाचे बुंध्याला चारही बाजूला कोवळ्या व खाली वाकणाऱ्या फांद्या असतात. याची पाने मोठी व अंडाकार असतात. लवंगाचे फुल निळसर तांबडे असते. तेच वाळून लवंग म्हणून बाजारात आणतात. याला साधारण नऊ वर्षांनी फुले येतात.लवंग हि स्वयपाकात व मसाल्यात वापरले जातात.



हि. लौंग सं. लवंग, देवकुसुम इं. क्कोव्ह लॅ. सायझिजियम ॲरोमॅटिकम, यूजेनिया कॅरिओफायलाटा कुल-मिर्टेसी). हे नाव लवंग या नावाने ओळखल्या जातात.

आपण मसाल्‍यात वापरतो ती लवंग म्‍हणजे लवंगाच्‍या झाडावरची कळी होय. पुर्ण वाढलेल्‍या कळया काढुन उन्‍हात वाळविल्‍या की, लवंग तयार होते. परंतु त्‍या तशाच वाढू दिल्‍यास त्‍यांचे फूलांमध्‍ये रूपांतर होते आणि नंतर फळात म्‍हणजेच एका कळीपासून एक लवंग किंवा एक फळ तयार होते.


भारतीय मसाल्याचे पदार्थ औषधी आहेत, हे आपण जाणतोच. लवंग हा असाच एक मसाल्याचा औषधी पदार्थ. लवंग दिसायला अगदी छोटीशी असली. तरी त्याचे औषधी गुणधर्म जबरदस्त आहेत. जाणून घेऊया लवंगाचे आरोग्यदायी फायदे...

डोके दुखत असल्यास लवंगाचा लेप लावतात. 

मुखरोगात लवंग तोंडात धरून चघळावी. 

दम, खोकला, आम्लपित्त यांवर लवंगाचा उपयोग होतो. 

खोकला व सर्दी यांवर लवंगाचा काढा करून त्यात मध घालून दयावा. कफ  मोकळा होतो. 

लवंगापासून लवंगादी वटी , लवंगोदक, लवंगादी चूर्ण, अविपत्तिकर चूर्ण ही औषधे बनवतात. 

लवंगाचा उपयोग जेवणात, मसाल्याच्या पदार्थात, साखर भात तयार करताना, 

विडा लावताना केला जातो. अशा या बहुगुणी लवंगाची लागवड मलाया, सैलिबीस बेटांवर मोठ्या प्रमाणात केली जाते. 

 वैद्यकात लवंगेचा वापर पुरातन आहे. ती सुगंधी, उत्तेजक व वायुनाशक असल्याने जठरातील दाहावर आणि अग्निमांद्यावर (भूक वाढविण्यास) देतात मलमळ, शिसारी, वांती आणि उदरवायू यांसारख्या तक्रारींवर लवंगेची पूड किंवा फांट (पाण्यात काढलेला रस) देतात. 

अतिसंवेदनाशील दंतिन (दातातील अस्थीसारखा पेशीसमूह) व किडक्या दातातील पोकळ्या यांना स्थानिक बधिरता आणण्यास तेल वापरतात. झिंक ऑक्साइड व लवंग तेल यांचे मिश्रण दातांतील पोकळ्यांत भरतात. 

तेल बाहेरून लावल्यास कातडी लाल होते. पोटात घेतल्यास वायुसारक व आकडी बंद करण्यास उपयुक्त असते. लवंग स्तंभक (आकुचंन करणारी), जंतुनाशक, कीटकनासक, पूतिरोधक (सूक्ष्मजीवांचा नाश करणारी ) असते.  

मळमळ व उलटी होणे, तसेच पोटाच्या तक्रारीवर तिची पूड किंवा रस देतात.  

स्वयंपाकात स्वादासाठी लवंग किंवा तिची पूड वापरतात. 

लवंग तेल किडलेल्या दाताला बधिरता आणण्यासाठी वापरले जाते. 

दंतधावने, गुळण्या करण्याचे पदार्थ, च्युईंग गम, साबण, सौंदर्यप्रसाधने, गरम पेये, तेले आणि अत्तरे यांतदेखील लवंग तेल वापरतात.


अशी मी मसाल्यांच्या डब्यातील महत्वाची आहेच आणि माझे औषधी गुणधर्म फारच उपयोगी आहेत. उद्या पाहू काळी मिरीची माहिती आणि फायदे. 


1 comment:

संत गाडगेबाबा

  संत गाडगेबाबा हा धडा शाळेतल्या पुस्तकात होता. पण माझ्या त्यांच्या विषयीची आस्था किंवा आपुलकी माझ्या घरापासून सुरु होते. गाडगेबाबाच्या आठवण...