श्रावणी सोमवार


श्रावणी सोमवार




श्रावणी सोमवारला अध्यात्मिक दृष्ट्या खूप महत्त्व आहे. 
अनेकजण श्रावणात सोमवारचे व्रत करतात. 
असे म्हणतात देवी पार्वतीने याच महिन्यात 
शिव शंकराना प्राप्त केले म्हणून 
हा महिना भगवान शंकरांना  प्रिय असतो, 
त्यामुळे याच महिन्यात भगवान शंकराची 
व्रत, उपास, उपासना केली जाते. 

माझ्या लहानपणापासून मी हे व्रत आजीने केलेलें पाहिलं आहे. 
अतिशय शास्त्रोक्त पद्धतीने आजी हे व्रत करायची. 
पहाटे उठून ओलेत्या वस्त्राने देवाची पूजा करायची. 
त्यानंतर देव्हाऱ्यातील शंकराची पिंडी ताम्हणात ठेवून 
त्यावर गधं-अक्षता वाहायची. पांढरे फुलं, 
कापसाचा चौसर, बिल्वपत्र वाहून 
मनोभावे नमस्कार करायची. 
दूध-पाण्याचा अभिषेक होई पर्यंत १०८ वेळा
 "ओम नमः शिवाय" हा जप करायची. 
त्यानंतर ताम्हण पूर्ण स्वच्छ कोरडे करून 
पिंडीवर धान्याचा अभिषेक करायची; 

दर सोमवारी वेगवेगळ्या प्रकारची धान्य असायची. 
जसे तांदूळ, तीळ, मूग, जवस; असे चार सोमवार 
चार धान्य मूठ मूठ पिंडीवर वहात असे...
ते वहात असतानाही ती स्तोत्र म्हणत असे...
ते म्हणजे

‘नम: शिवाय शान्ताय पंचवक्त्राय शूलिने ।
शृकङ्गिभृङ्गि-महाकालणयुक्ताय शम्भवे ।। 

बहुतेक सर्व व्रत आजी घरीच करीत असे;
तिच्या मानण्या प्रमाणे असे केल्यानं 
एक सकारात्मक परिणाम आपल्या वास्तूत होतो. 
त्यामुळे जितके तुम्ही तुमच्या वास्तूत 
अध्यात्मिक वातावरण ठेवता तितकी 
मनःशांती त्या वास्तूत राहणाऱ्या व्यक्तीना मिळते.
अशुद्ध भाव नाहीसे होतात.
पूर्ण दिवस आजीचा उपवास असायचा 
फक्त फळं नि दूध यावर असायची; 
तिन्हीसांजेला मौनात उपवास सोडायची. 


या चार सोमवार पैकी; कधी लघुरुद्र, 
कधी शिवमहिमन्न  तर कधी शिवलीलामृत पाठ केला जायचा. 
माझ्या आठवणी प्रमाणे आमच्याकडे 
तुळपुळे गुरूजी येऊन हे पाठ करायचे. 
आजी त्यांना पिंडीवर वाहिलेली धान्य दान करत असे.

हेच व्रत पण थोडे वेगळ्या पद्धतीने 
माझ्या आई-पपानी पण पुढे चालू ठेवले. 
अतिशय देवभोळे असल्याने वर्षभर 
त्यांची व्रतवैकल्य चालू असायची. 
माझ्या सासरीही अध्यात्मिक वातावरण असायचे.
पूजा-पाठ, व्रत, उपासना हे चालुच असायचे. 

लग्नानंतर पहिली पाच वर्षे मी हे शिवामूठ व्रत केले 
शिवमंदिरात जाऊन गधं, अक्षता, बेल 
आणि दूध-पाणी वाहून झाल्यावर 
पिंडीवर शिवामूठ मी वाहिली आहे. 
ती वाहताना 

"शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरदेवा, 
मनातल्या इच्छा पूर्ण कर रे देवा" असे ३ वेळा म्हणायचे

पूर्ण दिवस उपवास आणि संध्याकाळी शिवकथा वाचून 
नेवैद्य दाखवून उपवास सोडण्यात यायचा. 

यासगळ्या वातावरणाने मन प्रसन्न होते.
आपली सकारात्मक विचार करण्याची क्षमता 
अन मनाची एकाग्रता वाढते. 
आजही अनेकजण इतक्या भक्तीभावाने ही पूजा करतात. 
अनेकजण असेहि आहेत जे त्यांच्या
 दैनंदिन व्यवहारात जप आणि मानसपूजन यावर विश्वास ठेवतात. 

माझे मन मला सांगते जी प्रार्थना मनोभावे केली जाते 
ती ईश्वरचरणी पोहोचतेच आणि 
त्याची प्रचीती आपल्याला वेळोवेळी येत असते. 
।। ओम नमः शिवाय ।।

नागपंचमी



नागपंचमी 



श्रावण महिन्यातील इतर सणां पैकी 
नागपंचमी हा महत्वाचा सण आहे.    
या दिवशी नागोबाची पुजा केली जाते .

माझ्या लहानपणी आजी 
मातीचा नागोबा तयार करून त्याला पूजत असे.
नागोबा नागीण आणि त्यांची पिल्लं असे पाटावर ठेवले जायचे. 
मग आजी त्यांना हळद-कुंकू, गधं, 
अक्षता, फुलं वाहून पूजा करायची. 
नागवेल आणि कापसाचे वस्त्र सुद्धा वहायची. 
नागोबाला दूध आणि लाह्यांचा नेवैद्य असायचा. 

सकाळी नागोबाला पुजले जायचे आणि 
तिन्हीसांजेला शेतात किंवा नदी जवळ विसर्जन केले जायचे.
जेवणाच्या नेवैद्यात अळूची भाजी आणि मोदक आवर्जुन केले जायचे.
तसेच उकडीच्या शेंगाही केल्या जातात.


शेतकरी आपल्या शेताचा रक्षणकर्ता म्हणून नागोबाला पूजतात.
गावाकडे हा सण अतिशय उत्साहाने साजरा केला जातो.
यादिवशी माहेरवाष्णी आपल्या माहेरी येतात 
त्यांच्या करता गोड पदार्थ केले जातात.
नागोबाला भाऊ मानले जाते आणि 
आपल्या रक्षणकर्त्याचे बहिणी पूजन करतात.
नागपंचमीच्या रात्री शंकरा च्या मंदिरात 
रात्र जागवण्याची सुद्धा पद्धत आहे.

पूर्वी यादिवशी गारुडी नागोबाला घेऊन फिरत असत.  
स्त्रिया हळद - कुंकू आणि दूध-लाह्या वाहून त्याची पूजा करत.
पण आता हे दृश्य दिसत नाही कारण या वर बंदी घालण्यात आली आहे.

ज्यांच्या कडे भाद्गपद महिन्यात  गणेशाची  स्थापना करतात 
त्यांच्या कडे नागोबाची पूजा जरूर केली जाते.

तुम्हा सर्वांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा



.

श्रावणी शुक्रवार

श्रावणी शुक्रवार 

                                                    आजचा पहिला श्रावणी शुक्रवार

हिंदू धर्मातील अतिशय सात्विक महिना म्हणजे श्रावण महिना. 
या महिन्यात सणांची रेलचेल असते हे आपल्याला माहिती आहेच. 
प्रत्येक दिवशीचे महत्व आहे आणि त्याप्रमाणे त्याची व्रतवैकल्ये आहेत. 

मला माझ्या लहानपणीचा हा दिवस आठवतो; 
एकत्र कुटुंबात वाढल्याने सगळेच सण 
मोठया प्रमाणात साजरे केले जायचे. 
आजी श्रावणात एक तसबीर देव्हाऱ्यात ठेवायची 
या तसबिरी बद्दल माझ्या मनात खूप कुतुहल असायचे 
कारण वर्षभर ती दिसायची नाही पण या महिन्यात 
मात्र आवर्जून देव्हाऱ्यात ठेवली जायची. 



या दिवशी आजी, आई आणि काकी उपास करायच्या. 
संध्याकाळी देवापुढे दिवा लावला की 
आजी आम्हाला पाटावर बसवायची 
आणि वाण म्हणून पुरणाचे कानोले, गोड आरत्या हाती लावायची.  
कुमारिका आणि सवाष्ण बायकांना बोलवून 
हळद-कुंकू, गजरा किंवा फुल द्यायची. 
मग चणे-गुळाचा प्रसाद आणि गोड दूध दिले जायचे. 
दर शुक्रवारी हे ठरलेले असायचे. 
तेव्हा इतकंच समजायचे की आज वाण मिळणार 
आणि सगळ्या मैत्रीण येणार.

मोठे झाल्यावर कळू लागले की हें व्रत 
आपल्या मुलांच्या आयु-आरोग्यासाठी केले जाते. 
ती तसबिरी जिवंतिका देवीची असते; 
जिवती देवी म्हणजे पार्वतीचे रूप 
जी आपल्या बाळांचे रक्षण करते. 
तिचीच  हळद-कुंकू, गजरा वाहून पूजा केली जाते आणि 
नेवेद्य म्हणून पुरणाचा कानोला व गोड आरत्या केल्या जातात. 



जे आजीने व्रत केले तेच आई आणि काकीने पुढे चालू ठेवले; 
त्या अजूनही आम्हाला वाण द्यायला चुकत नाहीत. 
लग्नानंतर माझ्या सासूबाई सुध्दा हे व्रत करायच्या 
आणि आत्ता मीही हे  व्रत करते. 

आपण आपल्या संस्कृतिला जपले पाहिजे 
आणि ते पुढे चालू राहिले पाहिजे हे महत्त्वाचे. 
आता या सगळ्या रूढी, परंपरा, प्रथा बंद होत चालल्या आहेत. 
काही तर आजी आजोबांच्या सोबत लोप पावल्या 
असे म्हणायला हरकत नाही.
तरीही छोट्या प्रमाणात का होईना 
हे सगळे सणवार साजरे केले की आपल्या 
पुढच्य पिढीला त्याचे महत्व समजते. 
रोजच्या धावपळीच्या जीवनात आनंद मिळतो 
घरातील वातावरण प्रसन्न होते 
सगळे जण एकत्र येऊन या सणांचा आनंद घेऊ शकतात.

आपल्या सर्वांना श्रावणी शुक्रवारच्या 
हार्दिक शुभेच्छा 


दीप अमावस्या





दीपअमावस्या




शुभंकरोती कल्याणम
आरोग्यम धनसंपदा l
शत्रूबुद्धी विनाशाय
दीपज्योती नमोस्तुते ll
दिव्या दिव्या दीप्तकार
कानीकुंडले गळा मोतीहार l
दिवा जळो तुळशीपाशी
माझा नमस्कार सर्व देवानं पाशी ll

ही प्रार्थना आपण सर्वांनीच लहानपणी तिन्हीसांजेला केली असेलच. संध्याकाळी प्रत्येक जण आपापल्या घरी परततात तेव्हा ही प्रार्थना म्हणायची; आपल्या संस्कृतीत प्रथा आहे.
प्रकाश हे ऊर्जेचे रूप आहे. जिथे प्रकाशाचे अस्तित्व नाही तिथे अंधार होतो. प्रकाश ही आपल्याला तिमिरातून तेजा कडे नेणारी ऊर्जा आहे.
ही प्रकाशरुपी ऊर्जा आपल्याला नैसर्गिकरित्या सूर्यदेव देतातच या उर्जेमुळेच भूतलावरील अंधःकार दूर होतो आणि सृष्टीत चैतन्य निर्माण होते. प्रत्येक पेशींना या प्रकाशरुपी ऊर्जेची गरज असते.
जसा दिवस मावळत जातो तसा प्रकाश कमी होत जातो आणि अंधार पडायला सुरुवात होते. यावेळी आपण दीप प्रज्वलित करतो ज्यामुळे अंधार दूर होण्यास मदत होते. याच दिव्यासाठी आपण प्रार्थना आणि पूजन करतो.

आषाढी अमावस्येला म्हणजेच दीपअमावस्येला दिव्यांची पूजा केली जाते. घरातील सर्व प्रकारचे दिवे धुवून त्यात तेलवात-तुपवात लावून, हळद-कुंकू अन फुलं वाहून पूजा करतात. या दिवशी गोड पदार्थ करून त्याचा नेवैद्य दाखवला जातो.घर उजेडाने, धनधान्याने, आनंदाने, सुख-समाधानाने भरून जाऊ दे अशी प्रार्थना केली जाते.



दीप सूर्याग्निरूपस्तवं तेजस तेज उत्तमम ।
गृहाण मत्वकृतां पूजा सर्व कामप्रदो भव ।।


अर्थात
हे दीप, तू सुर्यरूप व अग्निरूप आहेस.
तेजामध्ये तू उत्तम तेज आहेस.
माझ्या पूजेचा तू स्विकार कर
आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर.





ईश्वराने आपल्या शरीरातील रचनेत एकच अवयव असा दिलाय की त्यातूनच आपल्या शरीरात प्रकाशाची किरणं आत प्रवेश करू शकतात.

ते म्हणजे आपले डोळे, आपली दृष्टी.
ज्यामुळे ईश्वराने निर्माण केलेली, विविधतेने नटलेली अन अनेक रंगानी सजलेली सृष्टी आपण पाहू शकतो आणि हे अवर्णनीय सौंदर्य अनुभवू शकतो.

ही दृष्टी म्हणजे दीप आणि आपलं शरीर म्हणजे घर असते; नाही का??
या दृष्टीला शरीरात तेवत ठेवता आलं पाहिजे.
या दृष्टी मार्गाने शरीरात प्रवेश करणाऱ्या ऊर्जेचे रूपांतर सकारात्मक करणे आवश्यक असते. आपले विचार शुद्ध आणि प्रसन्न असले पाहिजेत. यासाठी मन शांत आणि निर्मळ ठेवणे गरजेचे असते.
दृष्टीस पडते ते सर्वच आपण पाहतो पण त्यातले काय अंगीकारायचे ते आपल्यावर अवलंबून असते.

सृष्टीमध्ये संमिश्र म्हणजे चांगल्या-वाईट गोष्टी आहेत. देव आहे तिथे दानव आहे, सगुण तिथे अवगुण आहेच, पुण्य आहे तिथे पाप असतेच. त्यातूनच काय आत्मसात करायचे ते समजलं पाहिजे.

ईश्वराने निर्माण केलेल्या सृष्टीतही;
दिवस-रात्र आणि अमावस्या-पौर्णिमा होत असतात जिथे काही वेळा आपल्याला प्रसन्न वाटते तर काही वेळा आपल्याला उदासीन; हे सारे नैसर्गिक आहे.

प्रत्येक दिवशी आपल्याला डोळे उघडून हे जग पहायची संधी मिळते त्या प्रत्येक दिवसाकरता  ईश्वराचे आभार मानले पाहिजेत.

चला तर मग आज दीप अमावस्येला दिव्यांची पूजा करूया आणि आपल्या अंतर्मनातील दिव्याची ज्योत आपण सतत तेवत ठेवूया


सोनाली देवळेकर

आसव






आसव


प्रेमाचे प्रतिक





प्रेमाचे प्रतिक 



मी एकटीच दिमाखात






मी एकटीच दिमाखात 


मृगजळ






मृगजळ 



गुजगोष्टी







गुजगोष्टी 




प्रीतीची साक्ष





प्रीतीची साक्ष 






चाहूल प्रीतीची







चाहूल प्रीतीची 


नाते तुझे नि माझे



!! नाते तुझे नि माझे !!
काय आहे असे खास
तुझ्या नी माझ्या नात्यात
वेगळे विचार वेगळे स्वभाव
तरीही दोघात नसे दुजा भाव

मैत्री अन प्रेमा पलीकडे
आहे काहीतरी वेगळं म्हणून
मनातलं सांगावे वाटते सगळे
मनातले काहींना न ठेवता आत
विश्वास वाटतो तुझ्या कडूनच
मिळेल नेहमीच साथ

कट्टी-बट्टी होतंच रहाते
अबोलाही होतो आपल्यात
रुसवे-फुगवे आणि मनवणे
चालूच असते त्यात

त्या कट्यावरच्या गप्पा
अन नाक्यावरचा मका
पावसात भिजून टपरीवर
भुरकलेला चहा

अभ्यासासाठी भेटणे
अन स्वप्नात रमणे
रात्रीच्या अंधारातले डोळ्यांचे भिजणे
निखळ हास्य अन पावलात अडखळणे

नातं तुझं नी माझं नक्कीच आहे खास
ना करमत तुझ्या शिवाय
ना जमत तुझ्या शिवाय

सोनाली देवळेकर






क्षणभंगुर क्षण 



तुझी आठवण






तुझी आठवण 


तू, मी अन पाऊस




तू, मी अन पाऊस


COMMITMENT आयुष्यभराची





COMMITMENT आयुष्यभराची 








तुझी वाट पाहतेय मी 



वाचाल तर वाचाल






वाचाल तर वाचाल 


मन


मन खरच खुप निरागस असते
कधी कुठे जायचे त्याला कळत नसतें.
कुणाच्या मनात कधी शिरायचे 
आणि त्याला आपलेसे करायचे,तिथेच गुंतून राहायचे
की पट्कन निघून जायचे....

मन हें अल्लड असते
थोडे वेडे ही असते
कितीतरी आठवणीत गुरफटून राहते
ते कधीच मोठे होत नसते
धडपडत, रुसते, फुगते, रडते आणि रडविते
वेडी आशा बाळगून राहते आणि स्वतःच निराश होते.

मन हे जिद्दी असते उंच उंच उडू पाहते.
आकाशी झेप घेते
स्वप्नात रंगून जाते त्यातून बाहेर कसे 
पडायचे हेच त्याला समजत नसते.
म्हणूनच मनात विचार आला
मनाला जर दार असते तर नको ते विचार 
मनातून काढता आले असते.
एखाद्याला आत घ्यायचे की नाही ठरवता आले असते.
खरच मनाला दार असते तर 
दुःखी आठवणींना बाहेर काढले असते.
मनाला जर दार असते तर 
अवाजवी स्वप्न पाहण्या पासून थांबवता आले असते.

या निरागस मनाला कुलूप लावून 
स्वार्थी जगा पासून लपवून ठेवता आले असते.
मनाला जर दार असते तर 
या नाजूकश्य मनाला जपता आले असते.
मनाला जर दार असते तर 
सुखद आठवांनीना आणि 
हसवणार्या क्षणांना कायमचे ताळेबंद करता आले असते.
एक मनात विचार आला.
खरच मनाला जर दार असते

सोनाली देवळेकर

क्षण तुझे नी माझे

क्षण तुझे नी माझे
अनोळखी मैत्रीचे
अबोल प्रीतीचे
निनावी नात्याचे 
आणि न संपणाऱ्या ओढीचे

क्षण तुझे नि माझे
गडद रंगाचे
फुलांच्या सुगंधाचे
कधी हसरे कधी रुसवे
कधी रागाचे तर कधी लाडे भरायचे

क्षण तुझे नी माझे
एका अवीट गोडीचे
कधी लोणच्याच्या फोडीचे
कधी कारल्याच्या कडूचे 
तरी हवेहवेसे वाटणारे

क्षण तुझे नी माझे 
अतूट नात्याचे
हळूहळू उमलणारे 
हुरहूर लावणारे
आणि मनात काहुर गाजवणारे 

क्षण तुझे नी माझे 
पाकळी पाकळी खुलणारे
मन जपणारे
एकमेकांत मिसळणारे
आणि घट्ट बंधनात बांधणारे

सोनाली देवळेकर

आठवणी

आठवणींच्या झुल्यावर बसलो की 
तो आपोआपच झुलू लागतो
आणि मनात लपलेल्या 
भावनांना हळुवार जागवतो 

पारिजातकाचा दरवळ 
जुनी खूण देऊन जातो.
आणि अंगणातली फुलें वेचताना 
लागलेली ठेच ताजी करून जातो.
आठवणींच्या झुल्यावर बसलो 
की तो आपोआपच झुलू लागतो
आणि मनात लपलेल्या 
भावनांना हळुवार जागवतो.

पावसाची संतत धार आणि मातीचा सुगंध
एक अबोल साथ आणि धुंद निसर्ग
या संतत धारेची आठवण मनी काहुर करते
पुन्हां पुन्हा तीच साथ हात हाती गुंफते

फेसाळलेल्या कॉफी ची गंमत तर औरच आहे
आजही त्या बिलाची पावती माझ्या कप्प्यात बंद आहे
त्या कॉफीचा तो मग... मग आठवणी जाग्या करतो
आणि नकळतच डोळे पाणावून जातो.

मऊ मऊ वाळू, समुद्राच्या लाटा
एक निखळ हास्य आणि 
आसमंतातील विविध रंगी छटा
हे सारं आजचचं आहे हा आभास देऊन जातात
आणि गर्दीतही अगदी एकटं करून टाकतात

अशा अनेक आठवणी
मन रमवतात
ओठांवर हास्य, डोळ्यात चमक 
आणि जगायला नवी उमेद देतात.

सोनाली देवळेकर

माझ्या मनातले



माझ्या मनातले 

आपल्या नाशिबतली लिहिलेल्या घटना जशाच्या तशाच घडत असतात. खूप वेळा असे होतं की आपल्याला एखाद्या ठिकाणी जायचंच असतं पण नेमकं काहीतरी गडबड होते आणि ती वेळ चुकते; आणि नंतर समजतं की त्याठिकाणी अपघात झाला. आपली वेळ आली नव्हती त्यामुळे आपण बचावतो. याउलट ज्याची वेळ आलेली असते ती व्यक्ती तिथे कधी नव्हे तर आवर्जून हजर असते.

एखादी गोष्ट आपल्याला खूप सुखावते किंवा खूप दुखावत्ते. कधी कधी कोणाची एखादी कृती किंवा वागण्याने आपण disturb होऊन जातो. तसेच शब्द हे इतकं प्रभावी हत्यार आहे की खूप वेळा एखादया शब्दाने; बोलण्याने आपण दिवसभर disturbed राहतो. एखाद्यचे शब्द अगदी टोकाचा विचार करायला भाग पडतात. मग अशा वेळी त्यातून वेगळा मार्ग आपल्याला काढता आला पाहिजे. वाद न घालता आणि त्या बोलण्याचा आपल्या मनावर अधिराज्य न गाजवून देता  तिथून निघून गेले पाहिजे. 

प्रत्येकाच्या मानसिक स्थितीवर Move on होणे किंवा Let it go म्हणणे अवलंबून असते. काही जण पटकन बाहेर पडतात. अगदी दुसऱ्या क्षणाला normal असतात आणि काही  वर्षानूवर्ष तेच दुःख जपत असतात. 

स्वतःच्या मदतीने स्वतःला त्या situation मधून बाहेर काढता आले पाहिजे. आयुष्यात एकदा तरी प्रत्येक व्यक्ती अतिशय नैराश्याने ग्रासतें. तीच वेळ असते आपली मानसिकता ओळखण्याची. त्या परिस्थितीत आपण कोणते मार्ग अवलंबतो आणि त्यातून बाहेर पडतो हे महत्वाचे असते. 

आपण नेहमीच दुसऱ्याच्या आयुष्यावर हेवा करत असतो. काय मस्त माणूस आहे. एकदम life set आहे त्याचं; कसलं टेन्शन नाही नी काही नाही. पण प्रत्येकाची टेंशन्स, stress, कठीण काळ वेगळा असतो आणि तो पचवण्याची ताकतही प्रत्येकाची वेगळीच असते.

एकलकोंडीपणा वेगळा आणि एकटं पडणं वेगळं. Actually कोणीच कोणाला एकटं पाडू शकत नाही. प्रत्येक व्यक्तीवर, त्याच्या स्वभावावर आणि इगोवर  अवलंबून असते. 
एखादी व्यक्ती पटकन मिसळून जाते. कोणाही सोबत; ओळखी होतात, गप्पा सुरु होतात आणि काही जण कसं बोलू, कस दिसेल, काय म्हणतील या विचारात राहून एकटेच बसून असतात. जो पर्यंत दुसरी व्यक्ती त्यांना बोलवत नाही ते initiate करत नाहीत. 

एकटं पडलो जरी आयुष्यात तरी स्वतःशी मैत्री केली की कोणाची गरज लागत नाही. स्वतःचे मन गुंतवता आले पाहिजे. कोणताही आवड असेल, छंद असेल तर तो जोपासायला शिकले पाहिजे. मग ते गाणं म्हणणे असेल, ऐकणे असेल, वाचन करावे, फिरावे, झाडे लावा, नवीन पदार्थ करा शिवण काम, Drawings काढा अगदी काहीच नाही ना तर चक्क घराच्या खिडकीत बसा. वेळ कसा जातो समजणार पण नाही. 

स्वतः स्वतःचे मानसतज्ञ बना आणि आयुष्य जगत रहा. ते संपवण्याच्या आधी एकदा तरी विचार करावा; अजून काय लिहिलंय देवांनी आणि दैवाने आपल्या नशिबात. त्याचे कुतूहल असले पाहिजे मग मजा असते जगण्याची. 

रोज नवे प्रश्न , 
रोज नवी आशा, 
रोज नवे विचार, 
रोज नवी उत्तरे 

सोनाली देवळेकर

खिडकी




खिडकी

खिडकी म्हणजे खिडकीच असते....
एक सारखी दिसली तरी... 
प्रत्येकाची त्या खिडकीतली 
आठवण वेगळीच असते.

मामाच्या गावाला जाताना त्या झुकझुक गाडीच्या 
खिडकीतून पळती झाडे पाहण्याची मजा असते 
आणि रोज त्या झुकझुक गाडीला पळताना पाहून 
बाय !!!! बाय !!!!  असे ओरडण्याची झोपडीतल्या 
खिडकीची मजा ही काही औरच असते.......

शाळेच्या वर्गातील बाक असा शोधायचा की 
खिडकीतून उंचच उंच भराऱ्या घेणारे पक्षी बघता यावेत 
आणि आश्रमशाळेतील खिडकीतून 
उंच उडणारा पतंग सुद्धा आनंद देऊन जायचा.....

बंगल्यात रोज नातवाच्या येण्याची 
वाट बघणाऱ्या आजीची खिडकी 
आणि वृद्धाश्रमात नातवाच्या येण्याकडे 
आतुरतेने डोळे लावून बसलेल्या आजीची खिडकी......

मुसळधार पडणारा पाऊस पाहून 
आठवणीं जाग्या करणारी घरातील खिडकी....
तर याच पावसाने कंठ दाटवून 
टाकणारी हॉस्पिटलची खिडकी.

पक्ष्यांचा किलबिलाट, डवरलेली झाडे , 
रिंगीबेरंगी फुले आणि निळा आसमंत पाहणारी खिडकी 
या उलट भकास, काळोखी, प्रायश्चित भोगणारी 
आणि पश्चताप करणारी जेल मधली खिडकी

नवी आशा, नवी स्वप्न पाहणाऱ्या 
नवविवाहित स्त्री ची खिडकी 
आणि सर्व इच्छा संपलेल्या, कोणतीच स्वप्न न पाहू 
शकणार्या वेश्येची खिडकी......

अफाट बुद्धीमत्ता असलेल्या हुशार व्यक्तीची 
ऑफिस मधली खिडकी आणि 
अतिशय हुशार असलेल्या पण डोक्यावर परीणाम होऊन 
इस्पितळात असलेल्या मतिमंद मुलाची खिडकी....

नुकतेच लग्न झालेल्या "त्या" दोघांची खिडकी 
आणि नुकताच  divorce झालेल्या 
"त्या" .....दोघांच्या खिडक्या.....

आशा या वेगवेगळ्या खिडकीची आणि खिडकीत बसलेल्या 
प्रत्येकाची खिडकीतली आठवण अनमोल असते....

 सोनाली देवळेकर

संत गाडगेबाबा

  संत गाडगेबाबा हा धडा शाळेतल्या पुस्तकात होता. पण माझ्या त्यांच्या विषयीची आस्था किंवा आपुलकी माझ्या घरापासून सुरु होते. गाडगेबाबाच्या आठवण...