मसला मसाल्यांचा भाग - ८ दालचिनी आणि तमालपत्र





नमस्कार मंडळी मी दालचिनी; आज मी माझ्या बद्दल तुम्हाला माहिती देणार आहे. 

गरम मसाल्यातील दालचिनीचा आपल्या स्वयंपाकामध्ये आवर्जून वापर केला जातो. भारतीय मसाल्यांमधील दालचिनीला आयुर्वेदामध्येही विशेष असे महत्त्व आहे. पारंपरिक काळापासून दालचिनीचा आणि तमालपत्राचा स्वयंपाकात व आयुर्वेदिक औषधांमध्ये वापर केला गेला आहे. स्वयंपाकघरात वापरावयाची दालचिनी म्हणजे झाडाच्या आतील खोडाच्या सालीची पुंगळी असते. याच जातीच्या एका वृक्षाच्या वाळवलेल्या पानांना तमालपत्र (हिंदीत तेजपत्ता, Cinnamomum tamala) म्हणतात.याचे इंग्लिशमधील सिनॅमन (Cinnamon) हे नाव ग्रीक भाषेतील सिन्नामोमोन या शब्दापासून आलेले आहे. 

लोक आपल्या आहारामध्ये वेगवेगळ्या स्वरुपात गरम मसाल्याचा वापर करतात. दालचिनीचे आरोग्यवर्धक तसंच सौंदर्यवर्धक देखील फायदे आहेत. यातील औषधी गुणधर्मांमुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास मदत मिळते. 

काही जणांना दालचिनीचा चहा पिण्याचीही सवय असते.

दालचिनी हा मुख्यतः श्रीलंका देशात आणि भारतात केरळ राज्यात उगवणारा सदाहरित वृक्ष आहे. दालचिनीचे झाड सदाहरित आणि छोट्या झुडूपासारखे असते.पूर्ण वाढलेले झाड ६ ते १५ मी.उंचीचे असते.त्याच्या खोडाची साल निवडून घेऊन वाळवतात.त्यांचा आकार कौलासारखा गोल,जाड,मऊ आणि तांबूस रंगाचा असतो. दालचिनीची पैदास कोणत्याही प्रकारच्या जमिनीत होऊ शकत असल्याने अत्यंत सुपीक जमिनीपासून मुरुमाड, रेताड जमिनीत दालचिनी पिकते. दालचिनी हे बागायती पिक असले तरीदेखील समुद्र सपाटी पासून १००० मी.उंचीवर हे पिक कोठेही घेतले जाते. दालचीनिला सुगंध असतो.यांचा वापर सर्वत्र मसाल्याचा पदार्थ आणि औषधी म्हणून करतात.याचे तेल ही काढले जाते.

दालचिनीला लवंगानंतर सर्वोत्तम एंटीऑक्सिडेंट मानले जाते. तुम्हाला जाणून आनंद होईल की या मसाल्याचे खूप लांबलचक आणि समृद्ध इतिहास आहे. दालचिनीचे सर्वांत पूर्वीचे वापर जवळपास 2000-2500 ईसापूर्व मधील आढळले आहे. दालचिनीला यहूदी बायबलमध्ये अभिषेकाचे पदार्थ म्हणून नमूद करण्यात आले आणि तिला इजिप्शिअन लोकांनी ममीकरण पद्धतींमध्ये देखील वापरले आहे. रोममध्ये, दालचिनीला अंत्यसंस्काराच्या दरम्यान मृत शरिरांच्या दुर्गंधीला दूर ठेवण्यास वापरले जाई. वास्तविक पाहता, या मसाल्याचे महत्त्व रोममध्ये एवढे होते की केवळ समृद्ध लोक ते वापरू शकत होते.

दालचिनीचे प्रकार: दालचिनीच्या खूप प्रकारच्या प्रजाती असतात, पण सर्वांत सामान्य अशा दोन प्रकारच्या प्रजाती आहेत: 

सिलॉन सिनॅमॉन: ज्याला ट्रू सिनॅमॉन असेही म्हटले जाते. ती सर्वाधिक श्रीलंकेमध्ये पिकते आणि खूप महाग आहे. तिचा सुगंध गोड आणि हलका असतो. सिलॉन सिनॅमॉन एकामेकावर एक पोकळ नळीच्या रूपात एकामेकावर गुंडाळलेल्या पातळ कागदाच्या परतींसारखी दिसते आणि तिचे रंग खूप हलके असते. 

कॅशिआ सिनॅमॉन: उत्पत्तीचे स्थान असल्यामुळे तिला चायनीझ सिनॅमॉन असेही म्हणतात. ते दालचिनीचे सर्वांत सामान्य असे प्रकार आहे. कॅशिआ सिनॅमॉन रंगामध्ये गडद तपकिरी असते आणि तिचा गंध कडक आणि मसालेदार चव असते. या प्रकाराच्या दालचिनीच्या काड्या एकल जाड चादर बनवून एक किंवा दोन्ही बाजूंनी पसरतात. तिचे क्युमॅरिन घटक सिलॉन सिनॅमॉनपेक्षा अधिक असते आणि अधिक प्रमाणामध्ये यकृतासाठी विषारी असते.




दालचिनी चवीला तिखट-गोड असते. दालचिनी उष्ण, दीपन, पाचक, मुत्रल, कफनाशक, स्तंभक गुणधर्माची आहे.मनाची अस्वस्थता कमी करते.यकृताचे (Liver)कार्य सुधारणा करते.स्मरणशक्ती (Memory) वाढवते. 

दालचिनीमध्ये आर्द्रता, प्रथिने (Protien), स्निग्ध पदार्थ,कर्बोदके (Carbo Hydrade), भस्म आढळतात. दालचिनीमध्ये फॉस्फरस (Phosphorus), सोडियम (Sodium), पोटॅशियम (Potassium), थायामीन (Thayamin), रिबोफ्लेविन (Reboflewin), निआसीन (Niasin), ‘अ’ आणि ‘क’ हि जीवनसत्वे ( Vitamin A & C ) आहेत.

दालचिनी उष्ण असलेने उन्हाळ्यात वापर कमी करावा. दालचिनीमुळे पित्त वाढू शकते.

पोटातील गडबडीसाठी, मधुमेहासाठी, वजन कमी करण्यासाठी, जिवाणूरोधी पदार्थ,कॅंडिडा संक्रमणांसाठी, रक्ताभिसरणासाठी दालचिनी अतिशय फायदेकारक ठरते. खोकला आणि पडसे मासिक समस्यांसाठी, मौखिक आरोग्यासाठी, तोंडाच्या गंधासाठी, एक संभाव्य कर्करोगरोधी पदार्थ म्हणून दालचिनी उपयोगी पडते. 

सध्या जगभरात करोना व्हायरसनं थैमान घातलं आहे. रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असेल तर करोना व्हायरसविरोधात लढणं शक्य आहे. दरम्यान करोना व्हायरसवरील उपचारादरम्यान दालचिनीचा सकारात्मक प्रभाव दिसून येत असल्याचे निदर्शनास आलं आहे. करोनाच्या या महामारीमध्ये दालचिनीचा उपयोग जास्त प्रमाणात होत आहे.

दालचिनीमध्ये औषधी गुणधर्मांचा मोठ्या प्रमाणात साठा आहे. हे घटक आरोग्यासाठी पोषक आहेत. दालचिनीमध्ये अँटी ऑक्सिडेंट भरपूर प्रमाणात आहेत. हे घटक ऑक्सिडेटिव डॅमेज आणि फ्री रेडिकलपासून आपल्या शरीराचा बचाव करतात. यामध्ये पॉलिफेनॉल्स नावाच्या सर्वात प्रभावी अँटी ऑक्सिडेंटचा समावेश आहे.

 पावसाळ्यात दालचिनीचे सेवन आवर्जून करावे. कारण या दिवसांमध्ये बॅक्टेरिअल आणि फंगल इन्फेक्शनचा धोका अधिक असतो. दालचिनीमध्ये अँटी बॅक्टेरिअल आणि अँटी फंगल गुणधर्म आहेत. हे गुणधर्म आपल्या शरीराचा संसर्गापासून बचाव करतात.

मधुमेहाचा धोका कमी करण्यासाठी दालचिनीचे सेवन करणं लाभदायक ठरते. दालचिनीमुळे शरीरातील रक्त शर्करा आणि इन्सुलिनचे प्रमाण संतुलित राहण्यास बरीच मदत मिळते. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार दालचिनीचे सेवन केल्यास मधुमेहाचा त्रास कमी होऊ शकेल.

मेंदूशी संबंधित आजारांना न्यूरोडोजेनेरेटिव्ह (Neurodegenerative diseases) या नावानंही ओळखले जाते. नियमित योग्य प्रमाणात दालचिनीचे सेवन करणाऱ्यांना या आजाराचा धोका कमी असतो. यामागे एक वैज्ञानिक कारण आहे. दालचिनीमधील औषधी गुणधर्म मेंदूमध्ये टाउ (Tau) नावाचं प्रोटीन तयार होण्यापासून रोखण्याचं कार्य करतात. या घटकामुळे अल्झायमर आजार होण्याची भीती असते. दरम्यान दालचिनीच्या सेवनामुळे मेंदूची कार्यप्रणाली जलदगतीने पार पडते, अशी माहिती अभ्यासाद्वारे समोर आली आहे.

 भारतामध्ये दरवर्षी हजारो नागरिक हृदयविकारामुळे मृत्युमुखी पडतात. खाण्यापिण्याच्या वाईट सवयी, बदलती जीवनशैली, व्यायाम न करणे यामुळे हृदयविकारांचा धोका वाढतो. दालचिनीचे सेवन केल्यास शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण संतुलित राहते आणि हृदयविकारांचा धोका कित्येक पटीनं कमी होऊ शकतो, अशी माहिती एका वैद्यकीय चाचणीदरम्यान निदर्शनास आली आहे. हृदयविकाराचे धोके टाळण्यासाठी आहारामध्ये दालचिनीचा समावेश करावा.




तमालपत्राचा (दालचिनीची पाने) जास्त वापर भारतीय जेवणात करतात. तसेच मसाल्यात याचा वापर केला जातो. तमालपत्रामध्ये अनेक औषधी गुण आहेत. या पानांचे तेलही काढले जाते. तमालपत्रात मोठ्या प्रमाणात अॅंटी-ऑक्सिडेंट आढळून येते.

याशिवाय पोटॅशियम, कॅल्शियम, लोह, सेलिनिअम यांचीही मात्रा अधिक आहे. दालचिनीची पाने जेवणाचा सुगंध वाढविण्यासाठी मदत करतात. खाद्यपदार्थांची चव वाढवणारा पदार्थ आहे. तसेच तमालपत्र खाणे एक अत्यंत फायद्याचे आहे.

तुम्हाला अपचन होत असेल तर तमालपत्राचा उपयोग करा. पोटातील ज्या काही समस्या असतील तर तमालपत्रामुळे दूर होतात. चहामध्ये तमालपत्रचा वापर करा. कप, अॅसिडिटी, पित्त या समस्यातून तुम्हाला आराम मिळू शकतो.

तमालपत्राचा लाभ डायबिटीज रुग्णाला होता. सामान्य रक्तातील साखरेची पातळी राखण्यास मदत करते. हा तमालपत्राचा प्रभाव सकारात्मक दिसून येत आहे. ज्यांना डायबिटीज आहे त्यांनी तमालपत्राचे सेवन करणे गरजेचे आहे. ते त्यांना  अधिक लाभदायक आहे.  

रात्री चांगली झोप हवी असेल तर तमालपत्राचे सेवन करा. त्यामुळे चांगली झोप येते. त्यासाठी तमालपत्राच्या तेलाचा उपयोग करा. काही थेंब पाण्यात टाकून ते पाणी प्राशन करावे.  

तमालपत्राने किडनी स्टोन (मुतखडा) आणि किडनीसंबंधीत ज्या काही समस्या असतील तर त्या दूर होतात. तमालपत्र पाण्यात टाकून पाणी उकळावे. उकळलेले पाणी थंड करुन पिणे. किडनी स्टोन, किडनीबाबतच्या समस्यांवर मात करता येते.  

तर मित्रांनो कशी वाटली मी, आहे की नाही आहारात उपयुक्त आणि तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर. 

पुढचा नंबर वेलदोड्याचा...



2 comments:

संत गाडगेबाबा

  संत गाडगेबाबा हा धडा शाळेतल्या पुस्तकात होता. पण माझ्या त्यांच्या विषयीची आस्था किंवा आपुलकी माझ्या घरापासून सुरु होते. गाडगेबाबाच्या आठवण...