दिवाळीचा तिसरा दिवस म्हणजे बलीप्रतिपदा; या दिवसाला दिवाळी पाडवा म्हणतात. दिवाळीतला पाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त आहे. अक्षय्य तृतीया, गुढीपाडवा, विजयादशमी (दसरा) हे पूर्ण मुहूर्त असून . साडेतीन मुहुर्तांना ईश्वराची पराशक्ती ब्रह्मांडात प्रक्षेपित होत असते. या शक्तीच्या प्रभावामुळे ब्रह्मांडातील सत्त्वगुणाला चालना मिळून सर्वत्र मंगलकारी लहरींचे प्रक्षेपण होऊन सद्गुणांना चालना मिळते. त्यामुळे साडेतीन मुहूर्तांच्या वेळी अनेक शुभकर्मे केली जातात.
आर्थिक हिशोबाच्या दृष्टीने व्यापारी हा दिवस नव्या वर्षाची सुरुवात मानतात. लक्ष्मीपूजअसायची न करून व्यापारी लोक वर्षाचा प्रारंभ करतात. त्यांच्या जमा-खर्चाच्या नवीन वह्या ह्या दिवशी सुरू होतोत. नवीन वह्या सुरू करण्यापूर्वी वह्यांना हळद-कुंकू, गंध, फूल,अक्षता वाहून त्यांची पूजा होते.
या दिवशी विष्णूने वामन बटूचे रूप घेऊन अनाठायी औदार्य दाखवणाऱ्या उदार बळीला कट करून जमिनीत म्हणजे पाताळात गाडले! बळीला पाताळाचे राज्य देऊन विष्णूने त्याच्या राज्याच्या द्वारपालाचे काम स्वीकारले. बली हा दुष्ट असुर होता, शेतकरी नव्हता.तो राजा होता अन त्याला विष्णूच्या वामन अवताराने मारले शेतकऱ्यांचा राजा बळी आणि श्रीकृष्ण यांचा मोठा भाऊ बलराम; बलराम आणि बळी या दोन शब्दात खूप फरक आहे ल आणि ळ चा बलराम हे शेतकरी लोकांचे प्रतिनिधीत्व करतात त्याची हत्यारेसुद्धा शेतकऱ्यांचे नांगर आणि मुसळ आहेत. म्हणूनच "इडा पीडा टळो, बळीचे राज्य येवो" अशी म्हण रूढ आहे! ती फक्त बळीराजा साठी आहे.
या दिवशी बळीची प्रतिमा तयार करून गोठ्यात ठेवतात व तिची पूजा करतात. गायी-बैलांच्या शिंगांना रंग लावून व त्यांच्या गळ्यात माळा घालून त्यांना सजवतात. मस्त बैल व चपळ कालवडी यांची मिरवणूक काढतात. काही ठिकाणी दिवाळीच्या दिवसांत मशाली घेऊन नाच करण्याचीही प्रथा आहे. त्या आनंदोत्सवाचे हे महत्त्वाचे अंग मानले जाते. काही ठिकाणी बळीची अश्वारूढ प्रतिमा उंच जागी उभी करून तिच्या भोवती एकवीस दिवे मांडण्याचीही चाल आहे.बळीची पूजा करताना जमिनीवर पंचरंगी रांगोळीने बळी व त्याची पत्नी विंध्यावली यांची चित्रे काढून त्यांची पूजा करावी, त्यांना मद्यमांसाचा नैवेद्य दाखवावा व पुढील मंत्राने बळीची प्रार्थना करावी, असे सांगितले आहे –
बलिराज नमस्तुभ्यं विरोचनसुत प्रभो | भविष्येन्द्रासुराराते पूजेयं प्रतिगृह्यताम् ||
अर्थ – विरोचनपुत्र आणि सामर्थ्यवान बळीराजा, तुला नमस्कार असो. तू भविष्यकालीन इंद्र व असूरशत्रू आहेस. (तरी) ही (मी केलेली) पूजा तू ग्रहण कर.
त्यानंतर बळीप्रीत्यर्थ दीप व वस्त्रे यांचे दान करतात.
पूर्वी, बलिप्रतिपदेच्या पहाटे घरातील एखादी व्यक्तीे सर्व घर झाडून स्वच्छ करी. मग सगळा केर एका टोपलीत जमा करून त्या टोपलीवर जुनी केरसुणी, एक पणती व पैसा-सुपारी ठेवण्यात येई. ती टोपली घरातील प्रत्येक खोलीपुढे ओवाळली जाई.
घरोघरी सायंकाळी पाटाभोवती रांगोळी काढून पत्नी पतीला औक्षण करते व पती पत्नीला ओवाळणी घालतो. नवविवाहित दांपत्याची पहिली दिवाळी पत्नीच्या माहेरी साजरी करतात. ह्यालाच दिवाळसण म्हणतात. त्यानिमित्त यादिवशी जावयास आहेर करतात.
बलिप्रतिपदेच्या दिवशी गोवर्धनपूजा करण्याची प्रथा आहे. त्यासाठी शेणाचा पर्वत करून त्यावर दुर्वा- फुले खोचतात व कृष्ण, गोपाळ, इंद्र, गायी, वासरे यांची चित्रे शेजारी मांडून त्या सर्वांची पूजा करतात व मिरवणूक काढतात. ती पर्वतपूजा केली नाही, तर कार्तिकमासातील सर्व कृत्ये निष्फल होतात, असे सांगितले आहे.
पूर्वी गावागावांमध्ये बलिप्रतिपदेच्या दिवशी अन्नकूट घालण्याची प्रथा पाळली जात असे. या सोहळ्यामध्ये गावातील सर्व लोक आपापल्या घरातून एकेक पदार्थ घेऊन मंदिरात एकत्र येत असत. ते सर्व पदार्थ देवासमोर ठेवून नैवेद्य दाखवला जाई. मग गावकरी सहभोजन करत असत.
बलीराजाला दिलेल्या वचनानुसार दिवाळीचे तीन दिवस आश्विन कृष्ण पक्ष चतुर्दशी, आश्विन अमावास्या आणि कार्तिक शुक्ल पक्ष प्रतिपदा या दिवशी यमदीपदान केल्यामुळे जिवावर आलेले अपमृत्यूचे संकट टळते अन् धर्माचरण करणार्या व्यक्तींच्या घरी लक्ष्मी निवास करते. हे तीन दिवस पृथ्वीवर बलीचे राज्य असेल, असे सांगून भगवंताने त्याचा निस्सीम भक्त जरी असुर असला, तरी त्याचा मान राखून त्याला हा आशीर्वाद दिलेला आहे. यावरून भगवंताची तत्त्वनिष्ठा, भक्तवत्सलता आणि दातृत्व हे गुण प्रकर्षाने दिसून येतात.
गोवर्धनपूजा : या दिवशी लोक नवी वस्त्रावरणे लेवून सर्व दिवस आनंदात घालवितात. या दिवशी गोवर्धनपूजा करण्याची प्रथा आहे. त्यासाठी शेणाचा पर्वत करून त्यावर दूर्वा आणि फुले खोचतात. श्रीकृष्ण, इंद्र, गायी अन् वासरे यांची चित्रे शेजारी मांडून त्यांचीही पूजा करतात आणि मिरवणूक काढतात.
आध्यात्मिक महत्त्व : गोवर्धन पर्वतामध्ये श्रीकृष्णाचा अंश आहे. त्याच्यामध्ये ४ टक्के कृष्णतत्त्व असून श्रीकृष्णाची १० टक्के तारक आणि १० टक्के मारक शक्ती कार्यरत आहे. गोवर्धनपूजनाने एक प्रकारे गोपाळांचा प्रतिपाळ करणार्या गोवर्धनरूपी भगवान श्रीकृष्णाचेच पूजन केले जाते. त्यामुळे पूजकाला भगवान श्रीकृष्णाची कृपा प्राप्त होते. गोवर्धन पूजनामुळे सद्गुणांचे संवर्धन होते. मथुरेकडील लोक बलिप्रतिपदेच्या दिवशी सकाळी गोवर्धन पर्वताची पूजा करतात. ते ज्यांना शक्य नसेल ते गोवर्धनाची प्रतिकृती करून त्याची पूजा करतात. अन्नकूट म्हणजे वास्तवात गोवर्धनाची पूजा होय. प्राचीन काळी हा उत्सव इंद्राप्रीत्यर्थ होत असे. पण वैष्णव संप्रदाय बलवान झाल्यावर इंद्रपूजेचे रूपांतर गोवर्धनपूजेत झाले. विविध प्रकारची पक्वान्ने आणि खाद्य पदार्थ तयार करून ते कृष्णाच्या मूर्तीच्या पुढे मांडणे व कृष्णाला त्याचा नैवेद्य दाखविणे याला अन्नकूट म्हणतात.
यावर्षी दिवाळी पाडवा आणि भाऊबीज एकाच दिवशी आल्याने या दिवसाचे महत्त्व दुपटीने वाढले आहे. बहीण भावांच्या नात्याची वीण घट्ट करणारा सण म्हणून भाऊबीज साजरी केली जाते. या दिवसाला यमद्वितीया असेही म्हटले जाते. या दिवशी यम आपली बहीण यमुना हिच्या घरी भोजनास गेला, म्हणून या दिवसाला यमद्वितीया असे नाव मिळाले, अशी मान्यता आहे. दिवाळीतील महत्त्वाचा आणि शेवटचा सण म्हणजे भाऊबीज. या दिवशी बहीण आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते.
या वर्षीची दिवाळी जरी आपण सगळ्यांनी थोडक्यातच आवरती घेतली असली तरी पुढच्या दिवाळीची जोरात तयारी आणि प्लानिंग आपण नेहमी प्रमाणे सुरु करूया एका सकारात्मक भावनेने आणि उत्साहाने वाट पाहूया येणाऱ्या दिवाळीची.
या नंतरच्या भागात मी आजीच्या पद्धतीने अन अम्झ्या सासरी केले जाते त्या तुळशी लग्नाची माहिती लिहिणार आहे.
आपले अभिप्राय कोमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा



No comments:
Post a Comment