आज दुसरा दिवस
माळ दुसरी – अंबे माते कि जय !!!!!!!!!!!!!
देवीची उग्र व सौम्य अशी दोन रूपे पहायला मिळतात. उमा, गौरी, पार्वती, जगदंबा , भवानी ही देवीच्या सौम्य
रूपांची नावे असून; दुर्गा, काली, चंडी, भैरवी, चामुंडा ही देवीची उग्र
रूपे आहेत.
प्रथमं
शैलपुत्रीति, द्वितीयं
ब्रह्मचारिणी ।
तृतीयं
चन्द्रघण्टेति, कूष्मांडीति
चतुर्थकम् ।।
पंचमं
स्कंदमातेति षष्ठं कात्यायनीतिच ।
सप्तमं
कालरात्रिश्च महागौरीतिचाष्टमम् ।।
नवमं
सिद्धिदां प्रोक्ता नवदुर्गाः प्रकीर्तिताः ।
उक्तान्येतानि
नामानि, ब्रह्मणैव
महात्मना ।।
पाहिली
नवदुर्गा शैलपुत्री म्हणजे पर्वत कन्या, हि वृषभावर आरूढ आहे. या देवीच्या उजव्या
हातात त्रिशूळ आणि डाव्या हातात कमळ आहे. हि देवी बालिका स्वरूप असूनही सक्षम आणि
सबला आहे याचे प्रतिक म्हणजे तिच्या उजव्या हातातले त्रिशूळ आणि कमळ म्हणजे तिच्या
अलौकिक ज्ञानाचे आणि उर्जेचे प्रतिक आहे. हिमालायची कन्या असलेल्या या शैलपुत्री
देवीला शुभ्रवस्त्र शुभ्र फुला आणि पांढऱ्या गोड पदार्थाचा नेवेद्य अर्पण केला
जातो. पर्वत कन्या असल्याने पंचमहाभूतातील पृथ्वीतत्त्व हे तिचे प्रतिक आहे.
नवरात्रीतल्या नऊ दिवसांपैकी प्रत्येक दिवशी देवीला वेगवेगळ्या
फुलांच्या माळा घालायची प्रथा काही समाजगटांत आहे.
पहिली माळ - शेवंती
आणि सोनचाफ्यासारख्या पिवळ्या फुलांची माळ
दुसरी माळ - अनंत, मोगरा, चमेली, किंवा तगर यांसारख्या
पांढऱ्या फुलांची माळ.
तिसरी माळ - निळी फुले. गोकर्णीच्या किंवा |कृष्णकमळाच्या. फुलांच्या
माळा.
चौथी माळ - केशरी
अथवा भगवी फुले. अबोली, तेरडा, अशोक किंवा तिळाची फुले.
पाचवी माळ - बेल
किंवा कुंकवाची वाहतात..
सहावी माळ - कर्दळीच्या
फुलांची माळ.
सातवी माळ - झेंडू किंवा नारिंगीची फुले.
आठवी माळ - तांबडी
फुले. कमळ, जास्वंद, कण्हेर किंवा गुलाबाच्या
फुलांची माळ.
नववी माळ - कुंकुमार्चन
करतात.
नवरात्रातील प्रत्येक दिवशी येणाऱ्या वारानुसार भारतीय ज्योतिष्यांनी
प्रत्येक दिवसाचा रंग ठरवलेला आहे देवीला त्या त्या दिवशी त्या विशिष्ट रंगाची
साडी नेसवली जाते. रंगांची कल्पना एकोणिसाव्या शतकात, अगदी पेशवाईच्या काळातही
अस्तित्वात होती.
उगवत्या सूर्याचा रंग केशरी म्हणून रविवारचा रंग केशरी,
चंद्र पांढरा म्हणून सोमवारचा रंग पांढरा,
मंगळ लाल म्हणून मंगळवारचा रंग लाल
बुधवारचा निळा,
गुरुवारचा पिवळा,
शुक्रवारचा हिरवा, आणि
शनिवारचा करडा.
अश्याच काही मला समजलेल्या देवी बद्दलची माहिती आणि माझे अनुभव उद्याच्या
भागात पाहू.

रंगांची चांगली माहिती दिली आहे
ReplyDeleteछानच लिहिलंय!
ReplyDeleteChhan Mahiti Ranganxhi ani Malechi
ReplyDeleteChhan Mahiti Ranganxhi ani Malechi
ReplyDelete