आजचा दिवस पाचवा
आज काही जणांकडे पाच दिवसांच्या गणपतींचे विसर्जन करतात. आजच्याच दिवशी गौरीचे आवाहन केले जाते. भाद्रपद षष्ठीला गौरी येतात. दुसऱ्या दिवशी पूजन आणि तिसऱ्या दिवशी विसर्जन केले जाते. गौरी-पूजन हे अखंड सौभाग्या साठी केले जाते. गौरी आवाहन आणि पूजन करण्याची पद्धत प्रत्येकाची प्रथे आणि परंपरे प्रमाणे वेगळी असते. काही जण धातूच्या मुखवट्याच्या गौरी आणतात तर काही पाच मडक्याच्या वर मातीचे मुखवटे करून गौरी पूजतात. काही जण तर नदी काठची किंवा विहिरी काठची पाच दगड गौरी म्हणून पूजतात.
आमच्याकडे म्हणजे माझ्या माहेरी तेरडा अन आघाड्याची गौर पुजली जायची. माझी आई सांताक्रूझच्या काकांकडे ठाण्याहून गौर घेऊन जायची हे ठरलेलं असायचं...गौरीचे आगमन संध्याकाळीच होतें त्यामुळे आई बँकेतून निघाल्यावर गौर घेऊन ट्रेन आणि बस असा प्रवास करत बरोबर मुहूर्तावर पोहोचायची. आजी आणि काकीने सर्व तयारी करून ठेवलेली असायची. म्हणजे गौरीचे कपडे, वेणी, खण-नारळाची ओटी, दिवे लावलेल ताम्हण, हळद-कुंकू आणि पावलांची तयारी. माझी गौराई सोनपावली आली असे म्हणत तिचं स्वागत केले जायचे. कुंकवाची पावले टाकत गौर घरात यायची आणि तिला सर्व घर फिरवून पाटावर बसवले जायचे. तेरडा-आघाडा या दोन वनस्पतींची गौर असली तरीही त्या दिवशी तीच रूप महालक्ष्मी सारखंच दिसायचं. आजी, आई, काकी आणि इतर सवाष्णी गौराईला हळद-कुंकू, फुल वाहून पूजा करायच्या...त्या दिवशी संध्याकाळी नेवेद्यात पालेभाजी, भाकरी, गोडाचा शिरा, चटणी असे पदार्थ असायचे.
दुसऱ्या दिवशी वरणा-पुरणा चा नेवैद्य असायचा..खूप वर्षा आधी आईकडून ऎकलं होते की आमच्या गौरीला दुसऱ्या दिवशी मटणाचे जेवण असायचे पण गणपती आणि नॉनव्हेज जेवण करताना सोवळं पाळणे कठीण झाले म्हणून मग आमच्या गौरी गोडाच्या केल्या. तिसऱ्या दिवशी खीर-पुरीचे जेवण असायचे. बोटव्याची खीर ही आमची खासियत. कोणत्याही पूजेला ही खीर केली जातेच. तसाच पुरणाचा कानोलाही खास. आजीच्या हातच्या या पारंपरिक पदार्थांची चव जिभेवर अजूनही रेंगाळते.
अश्या या माहेरच्या गौराईच्या आठवणी...

तेरडा आणि आघाडा वनस्पती
लग्नानंतर सासरी गणपती गौरी सोबत जाणार असायचे पण आमच्याकडे गौर नव्हती. तरीही सासूबाई गौरीच्या दिवशी खीर-पुरी, काकडीचे घारगे असे नेवेद्याला करायच्या.
याचं दिवशी मला आयुष्यभर लक्षात राहील अशी भेट मिळाली ती म्हणजे मी गौरी पूजनाचे वेळी आई झाले. माझ्याकडे छोटी हसत-खेळत खरी खुरी गौराई आली तीही बरोबर दुपारी बारा वाजून दोन मिनिटांनी जेवायच्या वेळीच. सासर-माहेरी आनंदी आनंद झाला. खुपच खुशीत होतो आम्ही सगळे. आई होणे हा एक अनुभव आहे तो अनुभवावाच लागतो तेव्हा आई होण्याचे महत्व कळते. अशी कायम स्मरणात राहील अशी भेट मला बाप्पा कडून मिळाली..
गौरीची आरती
सोन्याच्या पावलांनी गौराई माझी आई
ओवाळीते कपूरने भक्त प्रसन्न झाली
महालक्ष्मी आली
कुंकवाने घातला सडा, मुखी आहे तांबुल विडा
हती शोभे हिरवा चुडा दिला प्रसादाचा पेढा
भाव भक्तीच्या केल्या माला
घातल्या अंबिकेच्या गळा
पायी वाजे घुंगर माला
केला नवरात्रीचा सोहळा
नेत्रांच्या लावल्या वाती
पंच्प्रनाच्या या ज्योती
आरती भक्त गण गाती
तेथे अम्बिकेची वस्ती
अम्बिकेची भरली ओटी
लावली चंदनाची उटी
कीर्ती तुझी हि जगजेठी
झाली दर्शनाला दाटी
सोन्याच्या पावलांनी गौराई माझी आई
ओवाळीते कपूरने भक्त प्रसन्न झाली
महालक्ष्मी आली
असेच माझे या दिवसातील काही अनुभव आणि आठवणी उद्याच्या भागात पाहू...

छान आहे ही माहिती
ReplyDeleteKhupch Chan 👌👌👌👌👍👍Gourai baddle khup Chan lihaly 👏👏🌹🌹
ReplyDeleteसमर्पक माहिती.
ReplyDeleteघरी तुझ्या खरी गौराई आली त्याच दिवशी हे ऐकून छान वाटलं
ReplyDeleteछान लिहिलं आहेस
सुप्रिया
खुप छान
ReplyDeleteSome or less, we also do have similar tradition of Mahalaxmi sthapna.
ReplyDeleteThe more information on differentiation between Gauri and Mahalaxmi would have been appriciated.
About nonveg bhog/ prasad to our deities, m dead against it. It's against our sanatan dharma. I think it's seems to be some type of adultrations introduced in our culture which is against our culture and sanskars.
खूप छान आठवणी शेअर केल्यात तुम्ही..👌👍
ReplyDelete