आजचा चौथा दिवस
मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया।।
गजवदना तू सुखकर्ता गजवदना तू सुखकर्ता... मोरया...$$$
माझी आजी मुंबईत एका शाळेत संस्कृत शिक्षिका होती...१९७८ साली ती रिटायर्ड झाली. तेव्हा सॅन्डऑफच्या वेळी तिला एक गणपतीची फोटो फ्रेम भेट म्हणून दिली गेली. त्यावेळी मी जेमतेम पाच वर्षांची होते. अजूनही ती फ्रेम माझ्या काकांच्या घरी लावलेली आहे. त्या गणपती बाप्पाचे रूप इतके लोभसवाणे होते की इतकी वर्ष हा कोणता गणपती आहे हे जाणून घेण्याची इच्छा झाली नाही. त्या रूपात एक वेगळाच गोडवा दिसायचा. नेहमीच्या गणपतीच्या रूपा पेक्षा हे रूप वेगळं आहे हे मात्र कळत होते. तर असा हा बाप्पा रोज सकाळी पुजला जायचा फ्रेम जुनी दिसू लागली की काका ती बदलून आणायचे. असे आज पर्यंत चालू आहे.
मी, माझे आई-पपा आणि बहीण एकदम आश्चर्यचकित होऊन पहातच राहिलो...कारण इतकी वर्ष जो आमच्याकडे फोटो फ्रेम मध्ये गणपती होता तो हाच आहे हे लक्षात आले. तेव्हा जो आनंद झाला त्याचे मी शब्दात वर्णन नाही करू शकत... एखादी ओळखीची व्यक्ती आपल्याला खूप वर्षांनी अचानक भेटते तेव्हा जसे होते तसेच काहीसे त्यावेळी झाले. अरे हा आपलाच बाप्पा असे वाटले....डोळे भरून आले त्याचे इतके सुंदर रूप प्रत्यक्षात पाहून.संगमरवरी शुभ्र मुर्ती अन त्यावर लाल जास्वंदीची फुलं उठून दिसत होती. गाभाऱ्यातच बसून रहावेसे वाटतं होतें. तेथील गुरवानी या बाप्पाची माहिती सांगितली.
हे मंदिर पेशवेकालीन आहे. रंगीत तटबंदी असलेले आणि फुलांनी सजलेले याचे आवार आहे. आजूबाजूला आमराई आहे; अतिशय प्रसन्न असा हा परिसर दिसतो. वेळणेश्वर पासून फक्त १०किलोमीटर अंतरावर हे मंदिर स्थित आहे. या मंदिरातील मुर्ती संगमरवरी असून; काश्मीर मध्ये घडवली आहे. तसेच महत्वाचे म्हणजे ही मूर्ती दशभुजांची आहे. गळ्यात नागराज व डाव्या मांडीवर लक्ष्मी बसली आहे. प्रत्येक हातात पुढील प्रमाणे एक असे आयुध आहे. त्रिशूल, धनुष्य, गदा, चक्र, शंख, परशु, निलकमल, पाश, रदन (दात), मोदक आणि धान्याची लोम्बी आहे.
या देवस्थानाला अष्टविनायका इतकीच महती आहे. अतिशय जागृत असे ठिकाण पहावयास मिळाले आणि बाप्पा तर एकदम खास ओळखीचाच निघाला. प्रसन्न मनाने आम्ही पुढील दर्शनासाठी निघालो.
।। बाप्पा मोरया।।
ल.म. जोशी आजोबांच्या साधना ते साक्षात्कार या पुस्तकातील पद
सदया प्रभोदयाळा
परमेश् ईशपाळा
होवो न दृष्ट कसली माझ्या उपासनेला
हेवा कुणी करावा
ये हाती हाची ठेवा
लाभेनं जे तपाने किंवा बहूंश्रमाने
तुझिया कृपे मोहोरली
फुलून दे अशी कृपाला
होवो न दृष्ट कसली माझ्या उपासनेला
सहवास हा गुरूंनी
उपदेश देवतांनी
दिधला मिळे न कोणा
भजूनी अनेक जन्मी
पुर्नन्दू वाढ होवो जावोनि शेवटाला
होवो न दृष्ट कसली माझ्या उपासनेला
असेच माझे अनुभव आणि बाप्पांची माहिती पुढच्या भागात पाहू...



खूप छान. हेदवी चा गणपती जोगळेकर कुटुंबाचा म्हणून पण ओळखला जातो. प्रेक्षणीय स्थान पण आहे
ReplyDeleteKhup Surekh Varnan. Malahi maza Hedvi Ganeshancha Darshan aathawla. Khuuuup Prasanna Parisar ani Watawaran. Bapa Moraya. Keep up your writing which gives Live Experience. Seemed like I was almost there. Abhinandan Sona.
ReplyDeletePrevious Comment was fm me Sarala Rao.
ReplyDeleteधन्यवाद मॅम... असेच आशिर्वाद असू देत
ReplyDeleteनेहेमी प्रमाणे छान लिहिले आहे. लेख वाचताना मी पण गणपती दर्शन घेतलं असे वाटले.
ReplyDeleteहेदवीचा लक्ष्मीगणपती खरंच अप्रतिम आहे.खूप प्रसन्ना वाटतं तिथे.
ReplyDeleteहेदवीचा लक्ष्मीगणपती खरंच अप्रतिम आहे.खूप प्रसन्न वाटतं तिथे.
ReplyDelete