आठवणींच्या झुल्यावर बसलो की
तो आपोआपच झुलू लागतो
आणि मनात लपलेल्या
भावनांना हळुवार जागवतो
पारिजातकाचा दरवळ
जुनी खूण देऊन जातो.
आणि अंगणातली फुलें वेचताना
लागलेली ठेच ताजी करून जातो.
आठवणींच्या झुल्यावर बसलो
की तो आपोआपच झुलू लागतो
आणि मनात लपलेल्या
भावनांना हळुवार जागवतो.
पावसाची संतत धार आणि मातीचा सुगंध
एक अबोल साथ आणि धुंद निसर्ग
या संतत धारेची आठवण मनी काहुर करते
पुन्हां पुन्हा तीच साथ हात हाती गुंफते
फेसाळलेल्या कॉफी ची गंमत तर औरच आहे
आजही त्या बिलाची पावती माझ्या कप्प्यात बंद आहे
त्या कॉफीचा तो मग... मग आठवणी जाग्या करतो
आणि नकळतच डोळे पाणावून जातो.
मऊ मऊ वाळू, समुद्राच्या लाटा
एक निखळ हास्य आणि
आसमंतातील विविध रंगी छटा
हे सारं आजचचं आहे हा आभास देऊन जातात
आणि गर्दीतही अगदी एकटं करून टाकतात
अशा अनेक आठवणी
मन रमवतात
ओठांवर हास्य, डोळ्यात चमक
आणि जगायला नवी उमेद देतात.
सोनाली देवळेकर

छान कविता.
ReplyDeleteआठवणी खूप सुंदरपणे कवितारूपी शब्दात गुंफल्या आहेत.
छान👌👌
ReplyDeleteVery nicely written.
ReplyDeleteखुप छान भाव व शब्द
ReplyDeleteखूप छान
ReplyDeleteखूप सुंदर व्यक्त केले आहे
ReplyDeleteGood. Keep writing.
ReplyDeleteफारच सुंदर मांडणी लगेचच बालपणात गेलो. धन्यवाद
ReplyDeleteआठवणींचा खजिना,छान!
ReplyDelete