आठवणी

आठवणींच्या झुल्यावर बसलो की 
तो आपोआपच झुलू लागतो
आणि मनात लपलेल्या 
भावनांना हळुवार जागवतो 

पारिजातकाचा दरवळ 
जुनी खूण देऊन जातो.
आणि अंगणातली फुलें वेचताना 
लागलेली ठेच ताजी करून जातो.
आठवणींच्या झुल्यावर बसलो 
की तो आपोआपच झुलू लागतो
आणि मनात लपलेल्या 
भावनांना हळुवार जागवतो.

पावसाची संतत धार आणि मातीचा सुगंध
एक अबोल साथ आणि धुंद निसर्ग
या संतत धारेची आठवण मनी काहुर करते
पुन्हां पुन्हा तीच साथ हात हाती गुंफते

फेसाळलेल्या कॉफी ची गंमत तर औरच आहे
आजही त्या बिलाची पावती माझ्या कप्प्यात बंद आहे
त्या कॉफीचा तो मग... मग आठवणी जाग्या करतो
आणि नकळतच डोळे पाणावून जातो.

मऊ मऊ वाळू, समुद्राच्या लाटा
एक निखळ हास्य आणि 
आसमंतातील विविध रंगी छटा
हे सारं आजचचं आहे हा आभास देऊन जातात
आणि गर्दीतही अगदी एकटं करून टाकतात

अशा अनेक आठवणी
मन रमवतात
ओठांवर हास्य, डोळ्यात चमक 
आणि जगायला नवी उमेद देतात.

सोनाली देवळेकर

9 comments:

  1. छान कविता.
    आठवणी खूप सुंदरपणे कवितारूपी शब्दात गुंफल्या आहेत.

    ReplyDelete
  2. खुप छान भाव व शब्द

    ReplyDelete
  3. खूप सुंदर व्यक्त केले आहे

    ReplyDelete
  4. फारच सुंदर मांडणी लगेचच बालपणात गेलो. धन्यवाद

    ReplyDelete
  5. आठवणींचा खजिना,छान!

    ReplyDelete

संत गाडगेबाबा

  संत गाडगेबाबा हा धडा शाळेतल्या पुस्तकात होता. पण माझ्या त्यांच्या विषयीची आस्था किंवा आपुलकी माझ्या घरापासून सुरु होते. गाडगेबाबाच्या आठवण...