पाचवी माळ
नवदुर्गेचे
पाचवे रूप 'स्कंदमाता' या नावाने ओळखले जाते. भगवान
स्कंद 'कुमार
कार्तिकेय' नावानेही
ओळखले जातात. ते देवासूर संग्रामात देवतांचे सेनापती बनले होते. पुराणात त्यांना
कुमार आणि शक्ती म्हणून त्यांचा महिमा वर्णन केलेला आहे. भगवान स्कंदची आई
असल्यामुळे दुर्गाच्या या रूपाला स्कंदमाता म्हणून ओळखले जाते.
स्कंदमाता चारभुजाधारी आहे. तिच्या उजव्या बाजूकडील खालील भुजा, जी वर उचललेली आहे, त्या हातात कमळाचे फूल आहे. डावीकडील वरच्या हातात वरमुद्रा तसेच खालील भुजा वरच्या बाजुला उचललेली आहे त्यामध्ये कमळाचे फूल घेतलेले आहे. या देवीचा रंग पूर्णत: शुभ्र आहे. ही देवी कमळाच्या आसनावर विराजमान असते. यामुळे या देवीला पद्मासना असेही म्हटले जाते. तिचे वाहन सिंह आहे. सूर्यमंडळाची अधिष्ठात्री देवी असल्यामुळे तिच्या भक्ताला अलौकीक तेज प्राप्त होते. आपण एकाग्र मनाने पवित्र होवून मातेला शरण येण्याचा प्रयत्न केला पाहिजे. या दुर्गेच्या पूजनाने आपल्या शरीरातील विशुद्ध चक्र प्रज्वलित होते.
ललिता पंचमी
नवरात्रोत्सवात ललिता पंचमी हे व्रत विशेष महत्त्वाचे आहे. याला
उपांग ललिता व्रतही म्हणतात. अश्विन शुद्ध पंचमीच्या दिवशी ललिता देवीची पूजा
करतात. या पूजाविधीमुळे विद्या,
धन, संपत्ती
व प्रतिष्ठा प्राप्त होते.
ललिता पंचमी हे व्रत धनप्राप्ती, विद्या प्राप्ती तसेच सर्व इच्छा पूर्ती होण्यासाठी केले जाते. या
दिवशी स्त्रिया रात्री एकत्र जमून देवीची गाणी आरती करतात. स्वतःच्या परसदारी तयार
झालेल्या कोवळ्या काकड्या आणि दूध असा रात्री प्रसाद म्हणून खाण्याची पद्धत आहे. या पूजाविधानात पुष्पांजली
समर्पण झाल्यावर गंधाक्षता युक्त व साग्र अशा अठ्ठेचाळीस दुर्वांची एक याप्रमाणे
अठ्ठेचाळीस दुर्वांच्या जुड्या करून मातेला अर्पण करण्याची प्रथा आहे.
जप करणे – मंत्र हे ऊर्जेने युक्त
असतात.सर्व शब्दांशी शक्ती, ऊर्जा संलग्न असते. जर
तुमचा कोणी एखाद्या अप्रिय,कटू
शब्दाने अपमान केला तर त्याचा तुमच्या मनावर विपरीत परिणाम होतो आणि जर कोणी तुमची
प्रशंसा, स्तुती केली, तुम्हाला सुंदर किंवा दयाळू म्हटले तर तुमच्यात काहीतरी मानसिक
उन्नती झाल्यासारखे वाटते.
मंत्र ह्या अतिशय प्राचीन ध्वनीलहरी आहेत.त्यांच्या बरोबर त्या सखोल
आणि परिवर्तन करणारी उर्जा घेवून येतात. आणि पूर्वापार, हजारो वर्षांपासून तेच मंत्र म्हटले जात असल्यामुळे त्यांचात अतिशय
शक्ती आहे.
आपल्या रोजच्या जीवनात, आपण
वेगवेगळ्या क्रियांमध्ये अडकलेले असतो. शिवाय येथे सतत आपल्या मनात विविध प्रकारचे
विचार सुरु असतात-जसे झगडणे, निर्णय घेणे इत्यादी. नवरात्र
हि अशी एकच वेळ आहे की ज्यावेळी आपण ह्या सर्व प्रवृत्ती बाजूला ठेवून आपल्या मूळ
स्त्रोत्राशी एक होऊ शकतो.
ध्यान – ध्यान तुम्हाला स्वत:च्या
अंतर्मनाकडे आणि मनाच्या पलीकडे घेऊन जाते. हा तुम्हाला तुमच्या आत्म्याकडे, सत्वाकडे घेऊन जाणारा मार्ग आहे. म्हणून नवरात्रीमध्ये दररोज ध्यान
करा. ध्यानामुळे तुमचे शरीर सामर्थ्यवान-स्वस्थ,मन शुद्ध आणि भावना मृदू,सौम्य आणि सकारात्मक
होतात.तुमची अंत:प्रेरणा वाढते,तुमच्यातील
ऊर्जा लहरी आणि सभोवतालची सकारात्मक ऊर्जा वाढते.जर तुम्ही एकत्र येऊन समूहामध्ये
ध्यान केलेत तर तो यज्ञ होतो.जेंव्हा एकत्र समुहामध्ये ध्यान केले जाते तेंव्हा
त्याचे फायदे जास्त अनुभवास येतात.कारण एकत्रित ध्यानात तुमच्या ऊर्जेचा स्तर
त्वरित उंचावतो.
अश्याच काही मला समजलेल्या देवी बद्दलची माहिती आणि माझे अनुभव
उद्याच्या भागात पाहू.

ध्यान याबद्दल खूप च छान लिहिलं आहेस
ReplyDeleteसुप्रिया
Nice information its also good for us if we follow the rituals as you said
ReplyDeleteस्कंद मातेचे खूप छान वर्णन केले आहे. तसेच इतर माहिती पण छान आहे
ReplyDeletemast
ReplyDeleteललितापंचमीची माहिती छान आहे.देवीची मूर्ति खूपच सुंदर!
ReplyDeleteखूप छान माहिती.अभ्यासपूर्ण लेखन!
ReplyDeleteखुप छान
ReplyDelete