खिडकी
खिडकी म्हणजे खिडकीच असते....
एक सारखी दिसली तरी...
प्रत्येकाची त्या खिडकीतली आठवण वेगळीच असते.
मामाच्या गावाला जाताना त्या झुकझुक गाडीच्या खिडकीतून
पळती झाडे पाहण्याची मजा असते आणि रोज त्या झुकझुक गाडीला पळताना पाहून
बाय !!!! बाय !!!! असे ओरडण्याची झोपडीतल्या खिडकीची मजा ही काही औरच असते.......
शाळेच्या वर्गातील बाक असा शोधायचा की खिडकीतून
उंचच उंच भराऱ्या घेणारे पक्षी बघता यावेत आणि आश्रमशाळेतील खिडकीतून
उंच उडणारा पतंग सुद्धा आनंद देऊन जायचा.....
बंगल्यात रोज नातवाच्या येण्याची वाट बघणाऱ्या आजीची खिडकी आणि
वृद्धाश्रमात नातवाच्या येण्याकडे आतुरतेने डोळे लावून बसलेल्या आजीची खिडकी......
मुसळधार पडणारा पाऊस पाहून आठवणीं जाग्या करणारी घरातील खिडकी....
तर याच पावसाने कंठ दाटवून टाकणारी हॉस्पिटलची खिडकी....
पक्ष्यांचा किलबिलाट, डवरलेली झाडे , रिंगीबेरंगी फुले आणि
निळा आसमंत पाहणारी खिडकी या उलट भकास,
काळोखी, प्रायश्चित भोगणारी आणि पश्चताप करणारी जेल मधली खिडकी.....
नवी आशा, नवी स्वप्न पाहणाऱ्या नवविवाहित स्त्री ची खिडकी
आणि सर्व इच्छा संपलेल्या, कोणतीच स्वप्न न पाहू शकणार्या वेश्येची खिडकी......
अफाट बुद्धीमत्ता असलेल्या हुशार व्यक्तीची ऑफिस मधली खिडकी
आणि अतिशय हुशार असलेल्या पण डोक्यावर परीणाम होऊन
इस्पितळात असलेल्या मतिमंद मुलाची खिडकी....
नुकतेच लग्न झालेल्या "त्या" दोघांची खिडकी आणि
नुकताच divorce झालेल्या "त्या" .....दोघांच्या खिडक्या.....
आशा या वेगवेगळ्या खिडकीची आणि खिडकीत बसलेल्या प्रत्येकाची
खिडकीतली आठवण अनमोल असते....

खिडकी याविषयावर एवढी सुंदर कविता....
ReplyDeleteखुप छान. मनाला भावली ही कविता कवितेचा समारोप पण खूप छान केलात. एकंदरीत मस्तच.
खिडकी यावर पण इतके छान लिहिले आहे की मी पामर यावर काय प्रतिक्रिया देणार.
ReplyDeleteखूपच छान... लिहित रहा..
ReplyDeleteमस्त 'concept' आहे. विचार करायला भाग पाडते,
ReplyDeleteसुंदर
ReplyDeleteखिडकीबद्ददल इतकं लिहिणार्याची मनाची खिडकी किती सुंदर आहे सर्व काही सामावणारी,मस्त!
ReplyDelete