लोकमान्य बाळ गंगाधर टिळक

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक  





जन्म २३जुलै १८५६ साली 
रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली गावांत झाला. 
मूळ नाव केशव वडिलांचे नाव गंगाधर 
आणि आईचे नाव पार्वतीबाई  
वयाच्या१०व्या वर्षी वडिलांची बदली झाली 
त्यामुळे पुण्यात वास्तव्य सुरु झाले. 
अतिशय हुशार अन शिस्तप्रिय व्यक्तिमत्त्व असलेले 
अन्याय सहन होत नसे. 
आई-वडिलांचे निधनानंतर काका 
गोविंदपंत यांनी सांभाळ केला 
कुस्ती, पोहोणे, नौका चालवणे अतिशय आवडत असे. 
परिपूर्ण आहार आणि शारीरिक क्षमता यांकडे 
 विशेष लक्ष व महत्त्व दिले जायचे. 

दिवसेंदिवस शेतीवर चरितार्थ चालवणं 
कठीण होऊ लागले होते 
त्यामुळे त्यांनी शिक्षकांची नोकरी सुरू केली. 
गणित आणि संस्कृत या विषयावर त्यांचे प्रभुत्व होते. 
डेक्कन कॉलेज मध्ये १८७६ साली बी. ए. झाले 
आणि १८७९ मध्ये एल. एल. बी. 
याच दरम्यान त्यांचा परिचय विष्णु शास्त्री चिपळूणकर व 
गोपाळराव आगरकर यांच्या सोबत झाला. 
हे तिघेही भारतीय जनतेच्या मनात देशप्रेम, 
स्वराज्य प्रेम निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत होते. 
१८८० साली त्यांनी न्यू इंग्लिश स्कुल ची स्थापना केली. 

याच सोबत केसरी आणि मराठा ही वृत्तपत्रे ही सुरू केली. 
या वृत्तपत्रान द्वारे टिळकांनी भारतीय जनतेचच्या मनात 
इंग्रजा विरुद्ध असंतोष निर्माण करणे सुरू केले. 
त्यामुळेच त्यांना असंतोषाचे जनक म्हणून संबोधले जाते.
 इंग्रजांना केसरी आणि टिळकांच्या देशभक्तीची 
दहशत निर्माण झाली.त्यांची झोप उडाली होती. 

टिळकांवर अब्रू नुकसानीचा दावा केला गेला; 
आणि त्यानां पहिला तुरुंगवास झाला. 

१८८५ साली पुण्यात टिळकांनी आणि आगरकरांनी मिळून 
फर्ग्युसन महाविद्यालयाची स्थापना केली. 
टिळक राष्ट्रीय पातळीवर सामाजिक कार्य करीत होते.
आपली मते अत्यंत निर्भीडपणे , प्रभावीपणे मांडत होते. 
उग्र आणि सत्य लेखन यामुळे केसरी लोकप्रिय झाला. 

प्लेगने मुंबईत धुमाकूळ घातला होता आणि 
१८९७ पर्यंत तो पुण्यातही येऊन ठेपला.
या संसर्गजन्य रोगाने अनेक बळी घेतले.
यातच टिळकांच्या मुलांचाही मृत्यू झाला. 
अतिशय वेगाने वाढत जाणाऱ्या 
या रोगावर प्रतिबंध करण्यासाठी 
रँड या अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली. 
या अधिकाऱ्याने लोकांवर रोगाच्या निवारणाच्या 
नावाखाली अत्याचार करणे सुरू केले. 
टिळकांनी याचा प्रचंड प्रमाणात विरोध केला.

२३ जून १८९७ ला चाफेकर बंधूनी रँड आणि त्यांचे साथीदार 
यांची गोळ्या घालून हत्या केली. 
यासाठी चाफेकर बंधूंना अटक करण्यात आली आणि 
त्यांना फाशीची शिक्षा सुनावली गेली; 
याच कटात टिळकही सामील होतें 
असे आरोप त्यांच्यावर केले गेले. 
त्यांना पुन्हा एकदा तुरुंगवास झाला.
 "अफजलखानाचा वध" 
या त्यांच्या लेखाने खळबळ उडवून दिली. 


 १ १/२ वर्षे पूर्ण झाल्यावर "पुनश्च हरी ओम" 
असे म्हणत त्यांनी त्यांची चळवळ सुरू केली. 
१९०५  मधील बंगाल फाळणी नंतर 
स्वदेशी, स्वराज्य, राष्ट्रीय शिक्षण आणि बहिष्कार 
या चार गोष्टीचा समाजात प्रसार केला. 
एका भाषणात त्यांनी म्हंटले होते 
" तूच जर शेती केलीस तर इथं सोनं पिकेल; 
पण दुसऱ्याचा नांगर फिरला तर 
इथं दुष्काळ आणि पारतंत्र पिकेल


"सरकारचे डोके ठिकाणांवर आहे का?" 
" राज्य करणे म्हणजे सूड उगवणे नव्हे" 
असे त्यांचे अग्रलेख प्रसिद्ध झाले. 

टिळकांच्या अशा जहाल लेखणी मुळेच ते 
लोकप्रिय आणि लोकमान्य नेता झाले. 

"स्वराज्य माझा जन्म सिद्ध अधिकार आहे 
आणि तो मी मिळणारच" 
असे ब्रिटिशांना ठणकावून सांगताना 
टिळकांच्या डोळ्यातील अंगार 
आणि स्वराज्य निष्ठा दिसतं असे. 
राष्ट्रीय पातळी, सामाजिक परिस्थिती 
आणि प्रासंगिक घटनांवर 
केसरीतुन लेखन करताना आर्याचे वसतिस्थान, 
ओरायन, शास्त्रीय पंचांग असे अनेक ग्रंथ लिहिले. 



सर्व स्तरातील लोकांना एकत्र आणण्यासाठी त्यांनी 
सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सव सुरू केले.

  "देशाचे दुर्दैव" हा त्यांचा लेख प्रसिद्ध झाला 
आणि १९०८ साली त्यांना देशद्रोही म्हणून 
६ वर्षांची भारता बाहेर मंडाले तुरुंगात 
काळ्या पाण्याची शिक्षा सुनावली गेली. 
याच काळात त्यांच्या पत्नीचे निधन झाले.
टिळकांनी  तुरुंगात असतानाच 
कर्मावर आधारित गीता रहस्य लिहिले. 
 
देशासाठी धडपड, उतारवयातील दगदग 
आणि मधुमेहाचा आजार यामुळे 
त्यांची प्रकृती खालावत होती. 
२० जुलै ला त्यांना हिवतापने ग्रासले 
वाताचे झटके सुरू झाले 
बोलण्यात विसंगती येऊ लागली. 

१ ऑगस्ट १९२०  रोजी  त्यांची प्राणज्योत मालवली. 
भारताचा तेजस्वी सूर्य मावळला. 

राजकारण, तत्वज्ञान, खगोलशास्त्र, 
लेखन, न्यायशास्त्र, सनातन धर्मग्रंथ,
 गणित आणि संस्कृत  यात मातब्बर असलेल्या 
या समाजसुधारक आणि स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या 
व्यक्तिमत्वाला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण.

6 comments:

  1. एक महान क्रांतिकारक.
    त्याला तू छान आदरांजली वाहिली आहेस.

    ReplyDelete
  2. वा... खूप मस्तच लिखाण

    ReplyDelete
  3. छान लिहिले आहे 🙏👍

    ReplyDelete
  4. Chan lihals 👌👌👏👏👍

    ReplyDelete

संत गाडगेबाबा

  संत गाडगेबाबा हा धडा शाळेतल्या पुस्तकात होता. पण माझ्या त्यांच्या विषयीची आस्था किंवा आपुलकी माझ्या घरापासून सुरु होते. गाडगेबाबाच्या आठवण...