मन


मन खरच खुप निरागस असते
कधी कुठे जायचे त्याला कळत नसतें.
कुणाच्या मनात कधी शिरायचे 
आणि त्याला आपलेसे करायचे,तिथेच गुंतून राहायचे
की पट्कन निघून जायचे....

मन हें अल्लड असते
थोडे वेडे ही असते
कितीतरी आठवणीत गुरफटून राहते
ते कधीच मोठे होत नसते
धडपडत, रुसते, फुगते, रडते आणि रडविते
वेडी आशा बाळगून राहते आणि स्वतःच निराश होते.

मन हे जिद्दी असते उंच उंच उडू पाहते.
आकाशी झेप घेते
स्वप्नात रंगून जाते त्यातून बाहेर कसे 
पडायचे हेच त्याला समजत नसते.
म्हणूनच मनात विचार आला
मनाला जर दार असते तर नको ते विचार 
मनातून काढता आले असते.
एखाद्याला आत घ्यायचे की नाही ठरवता आले असते.
खरच मनाला दार असते तर 
दुःखी आठवणींना बाहेर काढले असते.
मनाला जर दार असते तर 
अवाजवी स्वप्न पाहण्या पासून थांबवता आले असते.

या निरागस मनाला कुलूप लावून 
स्वार्थी जगा पासून लपवून ठेवता आले असते.
मनाला जर दार असते तर 
या नाजूकश्य मनाला जपता आले असते.
मनाला जर दार असते तर 
सुखद आठवांनीना आणि 
हसवणार्या क्षणांना कायमचे ताळेबंद करता आले असते.
एक मनात विचार आला.
खरच मनाला जर दार असते

सोनाली देवळेकर

6 comments:

संत गाडगेबाबा

  संत गाडगेबाबा हा धडा शाळेतल्या पुस्तकात होता. पण माझ्या त्यांच्या विषयीची आस्था किंवा आपुलकी माझ्या घरापासून सुरु होते. गाडगेबाबाच्या आठवण...