अनोळखी मैत्रीचे
अबोल प्रीतीचे
निनावी नात्याचे
आणि न संपणाऱ्या ओढीचे
क्षण तुझे नि माझे
गडद रंगाचे
फुलांच्या सुगंधाचे
कधी हसरे कधी रुसवे
कधी रागाचे तर कधी लाडे भरायचे
क्षण तुझे नी माझे
एका अवीट गोडीचे
कधी लोणच्याच्या फोडीचे
कधी कारल्याच्या कडूचे
तरी हवेहवेसे वाटणारे
क्षण तुझे नी माझे
अतूट नात्याचे
हळूहळू उमलणारे
हुरहूर लावणारे
आणि मनात काहुर गाजवणारे
क्षण तुझे नी माझे
पाकळी पाकळी खुलणारे
मन जपणारे
एकमेकांत मिसळणारे
आणि घट्ट बंधनात बांधणारे
सोनाली देवळेकर

अतीशय सुंदर आहे.क्षण तुझें नी माझे वाचुन जुने दिवस आठवले.♥️♥️
ReplyDeleteवाह ... खुप छान..
ReplyDeleteFarach sundar
ReplyDeleteमस्तच
ReplyDeleteसहज,सुंदर आणि सोपं वा👌..(.मला खूप आवडतं अस लिखाण)
ReplyDeleteमस्त
ReplyDelete