माझ्या मनातले



माझ्या मनातले 

आपल्या नाशिबतली लिहिलेल्या घटना जशाच्या तशाच घडत असतात. खूप वेळा असे होतं की आपल्याला एखाद्या ठिकाणी जायचंच असतं पण नेमकं काहीतरी गडबड होते आणि ती वेळ चुकते; आणि नंतर समजतं की त्याठिकाणी अपघात झाला. आपली वेळ आली नव्हती त्यामुळे आपण बचावतो. याउलट ज्याची वेळ आलेली असते ती व्यक्ती तिथे कधी नव्हे तर आवर्जून हजर असते.

एखादी गोष्ट आपल्याला खूप सुखावते किंवा खूप दुखावत्ते. कधी कधी कोणाची एखादी कृती किंवा वागण्याने आपण disturb होऊन जातो. तसेच शब्द हे इतकं प्रभावी हत्यार आहे की खूप वेळा एखादया शब्दाने; बोलण्याने आपण दिवसभर disturbed राहतो. एखाद्यचे शब्द अगदी टोकाचा विचार करायला भाग पडतात. मग अशा वेळी त्यातून वेगळा मार्ग आपल्याला काढता आला पाहिजे. वाद न घालता आणि त्या बोलण्याचा आपल्या मनावर अधिराज्य न गाजवून देता  तिथून निघून गेले पाहिजे. 

प्रत्येकाच्या मानसिक स्थितीवर Move on होणे किंवा Let it go म्हणणे अवलंबून असते. काही जण पटकन बाहेर पडतात. अगदी दुसऱ्या क्षणाला normal असतात आणि काही  वर्षानूवर्ष तेच दुःख जपत असतात. 

स्वतःच्या मदतीने स्वतःला त्या situation मधून बाहेर काढता आले पाहिजे. आयुष्यात एकदा तरी प्रत्येक व्यक्ती अतिशय नैराश्याने ग्रासतें. तीच वेळ असते आपली मानसिकता ओळखण्याची. त्या परिस्थितीत आपण कोणते मार्ग अवलंबतो आणि त्यातून बाहेर पडतो हे महत्वाचे असते. 

आपण नेहमीच दुसऱ्याच्या आयुष्यावर हेवा करत असतो. काय मस्त माणूस आहे. एकदम life set आहे त्याचं; कसलं टेन्शन नाही नी काही नाही. पण प्रत्येकाची टेंशन्स, stress, कठीण काळ वेगळा असतो आणि तो पचवण्याची ताकतही प्रत्येकाची वेगळीच असते.

एकलकोंडीपणा वेगळा आणि एकटं पडणं वेगळं. Actually कोणीच कोणाला एकटं पाडू शकत नाही. प्रत्येक व्यक्तीवर, त्याच्या स्वभावावर आणि इगोवर  अवलंबून असते. 
एखादी व्यक्ती पटकन मिसळून जाते. कोणाही सोबत; ओळखी होतात, गप्पा सुरु होतात आणि काही जण कसं बोलू, कस दिसेल, काय म्हणतील या विचारात राहून एकटेच बसून असतात. जो पर्यंत दुसरी व्यक्ती त्यांना बोलवत नाही ते initiate करत नाहीत. 

एकटं पडलो जरी आयुष्यात तरी स्वतःशी मैत्री केली की कोणाची गरज लागत नाही. स्वतःचे मन गुंतवता आले पाहिजे. कोणताही आवड असेल, छंद असेल तर तो जोपासायला शिकले पाहिजे. मग ते गाणं म्हणणे असेल, ऐकणे असेल, वाचन करावे, फिरावे, झाडे लावा, नवीन पदार्थ करा शिवण काम, Drawings काढा अगदी काहीच नाही ना तर चक्क घराच्या खिडकीत बसा. वेळ कसा जातो समजणार पण नाही. 

स्वतः स्वतःचे मानसतज्ञ बना आणि आयुष्य जगत रहा. ते संपवण्याच्या आधी एकदा तरी विचार करावा; अजून काय लिहिलंय देवांनी आणि दैवाने आपल्या नशिबात. त्याचे कुतूहल असले पाहिजे मग मजा असते जगण्याची. 

रोज नवे प्रश्न , 
रोज नवी आशा, 
रोज नवे विचार, 
रोज नवी उत्तरे 

सोनाली देवळेकर

4 comments:

संत गाडगेबाबा

  संत गाडगेबाबा हा धडा शाळेतल्या पुस्तकात होता. पण माझ्या त्यांच्या विषयीची आस्था किंवा आपुलकी माझ्या घरापासून सुरु होते. गाडगेबाबाच्या आठवण...